Monday, October 5, 2026
HomeनगरAhilyanagar : कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी; दुसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा...

Ahilyanagar : कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी; दुसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दुसर्‍या टप्प्यात 4 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना 2 लाखांपर्यंत पीककर्ज माफी दिली जात असून, आतापर्यंत 43 हजारांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाले असून त्यांच्या खात्यात 374 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

- Advertisement -

सन 2026-27 या आर्थिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी. 20,552 कोटी रूपये इतका निधी मंजूर असून सद्यस्थितीत. 13,551 कोटी रूपये निधी शिल्लक आहे. या निधीपैकी चार हजार कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : दुर्दैवी घटना! वडील-मुलासह नातूचा धरणात बुडून मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon तालुक्यातील कजवाडे (Kajwad) लगत असलेल्या सातवडी तलावात (Satvadi Lake) बुडून पिता-पुत्रासह नातूचा अंत झाल्याची घटना रविवारी (दि.४) दुपारी दीड वाजेच्या...