Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Onion News : लासलगाव बाजार समितीत लाल कांदा आवक वाढली; उन्हाळ...

Nashik Onion News : लासलगाव बाजार समितीत लाल कांदा आवक वाढली; उन्हाळ कांदा आवक शून्यावर

लासलगाव | हारून शेख | Lasalgaon

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon APMC) उन्हाळ कांद्याची आवक  पूर्णतः संपुष्टात आली आहे. गेल्या दोन- दिवसांत बाजार समितीत उन्हाळ कांदा आवक झालेली नाही. मात्र लाल कांद्याची (Red Onion) आवक वाढली असून बाजारभावात चढ-उतार दिसून येत आहेत.

- Advertisement -

चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी (Farmer) सात महिन्यापासून उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवला होता; मात्र हवामानातील बदलांमुळे त्यांना कोंब फुटू लागल्यामुळे कांदा बेचव होऊन मोठ्या प्रमाणावर साठवलेला कांद्याची प्रत खराब झाल्याने मागणी  घटली होती परिणामी, उन्हाळ कांद्याची आवक पूर्णपणे थांबली आहे. उन्हाळ कांद्याला या वर्षी समाधानकारक भाव मिळू शकला नाही त्यामुळे चांगल्या दराची अपेक्षा फोल ठरली.

चालू वर्षी च्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात सतत पाऊस झाल्याने लाल कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले होते. त्यामुळे दुबार रोपे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. परिणामी लागवड उशिरा झाल्याने तसेच ऐन काढणीच्या वेळेस परतीच्या पावसाने कहर घातल्याने दसरा दिवाळीला बाजारात येणारा लाल कांदा तब्बल दीड महिना उशिराने आला. शिवाय सुरवातीच्या काळात पावसामुळे हा कांदा बाधित असल्याने या कांद्याला अपेक्षित दर मिळाला नाही.

गेल्या काही दिवसापासून लाल कांद्यासाठी पोषक असलेली थंडी वाढल्याने प्रतवारीत सुधारणा होऊन कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी देखील वाढली आहे. सध्या बाजार समितीत केवळ लाल कांद्याची आवक सुरू असून, उच्च प्रतीच्या कांद्याला चांगले दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, भारतीय कांद्याला (Indian Onion) आखाती देशांसह मलेशिया, सिंगापूर आणि बांगलादेशमधून मागणी कायम आहे. तथापि, नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे काही देशांच्या सीमांवर निर्यातीचा वेग सध्या मंदावला आहे. बांगलादेशकडेही सध्या मर्यादित प्रमाणातच कांदा निर्यात होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. स्थानिक बाजारात वाढलेली आवक आणि निर्यातीचा मंद वेग यांचा बाजारभावावर काहीसा परिणाम जाणवत असून, जानेवारी महिन्यात लाल कांद्याची आवक  वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

लाल कांदा आवक वाढली

लासलगाव बाजार आवारावर दि.२२  ते २७ डिसेंबर या सप्ताहत लाल कांद्याची एक लाख १४ हजार २४४क्विंटल  आवक झाली.तर उन्हाळ कांद्याची १३६२ क्विंटल आवक झाली शुक्रवार व शनिवार या दिवशी उन्हाळ कांदा आवक झाली नाही.

ताज्या बातम्या

Shirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी शिर्डी...