Wednesday, January 15, 2025
HomeनाशिकNashik Police News : पोलिसांची संवेदनशीलता आणि सतर्कता

Nashik Police News : पोलिसांची संवेदनशीलता आणि सतर्कता

पेपर सोडवितानाच प्रसववेदना, अंमलदारांनी दिला मदतीचा हात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खाकी वर्दीतही भावनिक ओलावा असतो, याचा प्रत्यय रविवारी (दि.१) सकाळी आला. राज्य लोकसेवा आयोगाच्या (State Public Service Commission) परीक्षेचा (Exam) पेपर सोडविणाऱ्या एक गर्भवतीस प्रसवकळा सुरु झाल्या. त्यातच रक्तस्त्राव सुरू झाल्याने सर्व काळजीत पडले. त्याचवेळी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी नियुक्त महिला व पुरुष अंमलदारांनी माणुसकीसह सतर्कतेचा परिचय देत शासकीय व्हॅनमधून रुग्णालयात दाखल केले, डॉक्टरांनी तत्काळ उपचार केल्याने या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, बाळ तिची आई सुखरुप असून पोलीस व डॉक्टरांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. ही बाब तिच्या पती आणि नातलगांना समजताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी मनोमन पोलिसांचे आभार मानले.

- Advertisement -

युगंधरा गोरख गायकवाड असे प्रसूत झालेल्या स्पर्धा परीक्षार्थी महिलेचे नाव आहे. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतखण्यासाठी गायकवाड दाम्पत्य रविवारी (दि.१) मालेगाव येथून नाशिकमध्ये आले. गोरख यांचे परीक्षा केंद्र रमाबाई आंबेडकर कन्या शाळा असल्याने त्यांनी पत्नी युगंधरा हिला परीक्षेसाठी कॅनडा कॉर्नर जवळील व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या केंद्रात सोडले. त्यानंतर युगंधरा गायकवाड सकाळी ९ बाजेदरम्यान परीक्षा केंद्रात गेल्या. सकाळी १० वाजता परीक्षा सुरु झाल्यानंतर युगंधरा यांना प्रसव कळा सुरु झाल्या. त्या रक्तचंबाळ झाल्याने पर्यवेक्षक व परीक्षार्थी काळजीत पडले. त्यावेळी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे (Sarkarwada Police Station) हवालदार जयंत जाधव, महिला अंमलदार रोशनी भामरे कर्तव्यावर होते.

हे देखील वाचा : Rain Update News : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याचा अंदाज

युगंधरा यांना रक्तखाव सुरू झाल्याचे पर्यवेक्षकांनी सांगताच हवालदार जाधव व भामरे यांनी मदतकार्य केले. त्यांनी परीक्षा केंद्राबाहेरील शासकीय वाहनातून युगंधरा गायकवाड यांना उपचारार्थ रुग्णालयात नेण्याचे ठरवले. दोघांनी तत्काळ युगंधरा यांना वाहनातून पंडित कॉलनीतील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पोलिसांना वेद मंदिरजवळील चौधरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. युगंधरा यांची प्रकृती खालावल्याने जयंत जाधव यांनी चौधरी हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधत माहिती दिली. डॉक्टरांनी तयारी दर्शवताच युगंधरा यांना दाखल केले. डॉक्टरांनी नऊ महिने पूर्ण होण्याआधीच प्रसूती करावी लागणार असल्याने सिझर करण्याची तयारी केली. ही बाब डॉक्टरांनी (Doctor) पोलिसांनी सांगितली.

दरम्यान, अंमलदार जयंत जाधव यांनी युगंधरा गायकवाड यांच्या पती आणि सख्ख्या भावाचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यांनी रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत कर्तव्य बजावत असलेल्या मुंबई नाका पोलिसांशी संपर्क साधत गोरख गायकवाड यांना पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगावे, असा निरोप दिला. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनीही (Mumbai Naka Police) पर्यवेक्षकांना माहिती दिली. एमपीएससीची पहिल्या सत्राची परीक्षा संपताच गोरख गायकवाड रुग्णालयात आले. युगंधरा यांना मुलगी (Girl) झाली असून, दोघींचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik News : तापमान ११.५ अंशांवर

पोलीस मदतीला धावले नसते तर

या गोल्डन अवर्समध्ये युगंधरा यांना मदत मिळाली नसती तर तिचे आणि बाळाचे काय झाले असते?, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. मात्र व्ही. एन. नाईक महाविद्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि सतर्कता यातून मायलेकी सुरक्षित आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या