Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याहेल्मेट सक्ती : नाशिक पोलिसांचे साम, दाम नंतर आता दंड

हेल्मेट सक्ती : नाशिक पोलिसांचे साम, दाम नंतर आता दंड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर पोलिसांनी हेल्मेट सक्ती होण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवण्यात आल्या. त्यामुळे अनेक चांगले परिणाम दिसू लागले आहेत. नो हेल्मेट नो पेट्रोल (No helmet no petrol), नो हेल्मेट नो कॉपरेशन (No helmet no coopration) यासह दुचाकीस्वारांचे समुपदेशन करणे (bike riders counseling), दुचाकीस्वारांना परीक्षा (Examination) अनिवार्य करण्यात आल्यामुळे हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे…

- Advertisement -

असे असले तरीदेखील हेल्मेट सक्ती अजून पूर्णपणे झालेली दिसत नाही. नाशिककरांची नकारघंटाच पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता उद्या (दि १८) पासून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर थेट कारवाईला नाशिकपोलिसांकडून सुरुवात केली जाणार आहे.

यामध्ये विनाहेल्मेट दुचाकीस्वारास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. (without helmet bike rider fine) दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळून आले तर अशा दुचाकीस्वारांना दुप्पट दंड म्हणजेच १ हजारांचा दंड भरावा लागेल शिवाय आपला परवाना तीन महिन्यांसाठी रद्द होणार आहे. (licence cancel for three month) त्याचप्रमाणे दंड न भरल्यास वाहन जप्त केले जाणार आहे, दंड भरल्यानंतरच वाहन ताब्यात मिळणार आहे.

त्यामुळे आता हेल्मेट जर वापरले नाही तर खिसाही खाली होईल शिवाय कारवाईचा बडगा देखील उगारला जाणार आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या