Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Political : भाजप कोट्यातून नाशिकला मंत्रिपदाची शक्यता

Nashik Political : भाजप कोट्यातून नाशिकला मंत्रिपदाची शक्यता

आ. फरांदे आघाडीवर, हिरे व ढिकलेंचे नावही चर्चेत

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ पैकी १४ तर शहरातील चारही जागा महायुतीने पुन्हा काबीज केल्या आहेत. नाशिक मध्य, पूर्व व पश्चिम या ठिकाणी भाजपने तर देवळालीत राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकावला आहे. आता मुख्यमंत्री कोण होतो व मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे लक्ष लागले असून मंत्रिपद मिळविण्यासाठी विविध आमदारांकडून लॉबींग सुरू झाल्याचे चित्र आहे. मध्य नाशिकमधून तिसन्यांना निवडून आलेल्या आ. देवयानी फरांदे यांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे चालत असल्याचे समजते. त्याचप्रमाणे नाशिक पश्चिम मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आ. सीमा हिरे यांचे नाव देखील चर्चेत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला! किती जण घेणार मंत्रीपदाची शपथ?

मागच्या पंचवार्षिकमध्ये जिल्ह्यातील मालेगांव बाहामधून (Malegaon Outer) निवडून येणारे ज्येष्ठ शिवसेना नेते दादा भुसे, येबला मतदार संघातून निवडून येणारे राष्ट्रबादीचे ज्येष्ठनेते छगन भुजबळ यांना कॅबीनेट मंत्रिपद मिळालेले होते, त्यावेळी देखील भाजपच्या कोट्यातून नाशिकला मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती, मात्र तसे झाले नाही. म्हणून यंदा तरी भाजपच्या कोट्यातून नाशिकला मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही नावांसह शहरतील आ. फरांदे, आ. हिरे व आ.अॅड. राहुल ढिकले यांचे नाव देखील घेण्यात येत आहे. मुस्लीम बहुल भागातून आ. फरांदे यांनी 2 सलत तीन वेळा विजयश्री खेचून आणले म्हणून त्यांना यंदा मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होत आहे. फरांदे परिवार हा पूर्वीपासून भाजपशी एकनिष्ठ असून पक्ष संघटनेसह महापालिकेत देखील फरांदे यांनी उत्तम काम करुन दाखवले आहे.

हे देखील वाचा : Shrikant Shinde : महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण

आगामी नाशिक मनपा निवडणूक (Nashik NMC Election) व २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन लक्षात घेता नाशिक शहरात भाजपचा एक तरी मंत्री असणे गरजेचे असल्याने आ. देवयानी फरांदे यांच्या कार्यकर्त्याकडून त्यांचे भावी मंत्री असे बॅनर झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिपदाच्या चर्चाना जोर आला आहे. महिला नेत्यांमध्ये अदिती तटकरे, पंकजा मुंडे, मनीषा कायंदे, माधुरी मिसाळ, भावना गवळी, श्वेता महाले यांच्यासह मध्य नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांचे नाव मंत्री पदासाठी चर्चेत आहे. सुमारे ८० हजार मुस्लीम मते असलेल्या मध्य नाशिक मतदार संघातून आ. फरांदे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे चजनदार नेते व माजी आमदार वसंत गीते यांचा १७ हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर चालत आहे.

हे देखील वाचा :  नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भुजबळ-कांदे समर्थकांमध्ये बॅनरबाजी

पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेंच

नाशिकसारख्या (Nashik) महत्वाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच होत असल्याचे समजते आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते छगन भुजबळ व शिवसेनेचे ज्येष्ठनेते दादा भुसे यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारात भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतांना युती सरकारच्या काळात गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे होती. तर अडीच वर्षांपूर्वी महायुती सरकारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारात दादा भुसे पालकमंत्री होते. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदी कोणाची निवड होणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...