नाशिक | Nashik
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे.महायुती २३४ जागा जिंकून राज्यातील मोठी युती ठरली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असून ५ डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? भुजबळांच्या वक्तव्याने संभ्रम वाढला
येवला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात शपथविधीच्या आधीच नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून बॅनरबाजी सूरू झाली आहे. सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या समर्थकांकडून त्यांचे नाशिकचे भावी पालकमंत्री असे फलक काही दिवसांपूर्वी झळकले होते. त्यानंतर छगन भुजबळांचा देखील भावी पालकमंत्री, अशा आशयाचा नाशिक शहरात बॅनर लागला आहे. तर छगन भुजबळ हे नाशिकचे (Nashik) पालकमंत्री व्हावे, यासाठी युवक राष्ट्रवादीने काल महादेव मंदिरात दुग्ध अभिषेकही केला होता.
हे देखील वाचा : Shrikant Shinde : महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण
दुसरीकडे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांचे देखील भावी पालकमंत्री असे फलक दिसून आले आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांचे नाव चर्चेत असतानाच आता देवयानी फरांदे यांचे फलक झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड होणार? आणि देवयानी फरांदे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार का? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर कांदे आणि भुजबळांमध्ये मोठा वाद पेटला होता. तसेच सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांचा विधानसभा निवडणुकीत (Election) पराभव केल्यानंतर कांदे यांचे पुढचे टार्गेट छगन भुजबळ आहे का? तसेच भुजबळांना शह देण्यासाठी थेट कांदे समर्थकांनी पालकमंत्री पदावर दावा केला आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.