Thursday, November 21, 2024
HomeनाशिकNashik Political : नाशिक मध्यत हिंदुत्ववादाचाच विजय होणार; आमदार देवयानी फरांदे यांचा...

Nashik Political : नाशिक मध्यत हिंदुत्ववादाचाच विजय होणार; आमदार देवयानी फरांदे यांचा विश्वास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हिंदुत्ववाद हा माझा स्वाभिमान आहे. ती माझी अस्मिता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, त्याप्रमाणे हिंदूत्व ही सर्वसमावेशक जीवनशैली आहे. यावर माझी अतीव श्रद्धा व निष्ठा असल्याचे प्रतिपादन प्रा. देवयानी फरांदे यांनी केले.मध्य नाशकात झालेल्या प्रचारफेरीदरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या निवडणुकीत (Election) भरघोस मते मिळून हिंदूत्ववादाचा विजय निश्चितपणे होणार, असा विश्वासही प्रा. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

मला माझ्या धर्माचा सार्थ अभिमान आहे. ज्या धर्माने मला ताठ मानेने जगायला शिकवले त्याचा अर्थातच स्वाभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) अभिप्रेत असलेले हिंदूत्व आम्ही जगतोय. ही विचारधारा शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदूत्ववाद ही गरज आहे. काही राजकीय पक्षांना मात्र हिंदू असूनही हिंदुत्वाविषयी बोलण्याची लाज वाटते, अशी टीका फरांदे यांनी केली.

मी हिंदुत्ववादी असल्यामुळे विरोधक टीका करतात. पण हिंदुत्ववाद हा माझा स्वाभिमान आहे. ती माझी अस्मिता आहे. श्रद्धा आणि आस्थेचे हिंदुत्ववाद हे एक ठिकाण आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान का नसावा? ज्या धर्माने मला जगायला शिकवले त्याचा मला स्वाभिमान का नसावा? छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व आम्ही जगतोय. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेला हिंदुत्ववाद आज आमच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे आणि तो का नसावा? आज कुणीही झुंड करून यावे आणि आमच्या धर्मावर आक्रमण करावे? ही बाब आम्ही सहन कशी करणार? ‘आरे ला कारे’ने उत्तर देणे सर्वांनाच जमते. पण आम्ही सहिष्णू आहोत. त्यामुळे आम्ही सबुरीने घेतो, पण आमच्या सबुरीला कुणी हलक्यात घेत असेल तर त्यांना वठणीवर आणण्याची ताकद माझ्यासारखी सर्वसामान्य कार्यकर्ती ठेवते, हे ध्यानात असावे. अर्थात, ही माझी भूमिका के वळ वैयक्ति क विचारधारेवर आधारित नाही, तर ती माझ्या देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्याचा माझा संकल्प आहे, असे फररादे म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा (Amit Shah) कायमच उघडपणे हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या जाहीर भाषणात त्याचा पुनरुच्चार केला. ‘बटेंगे तो कटेंगे’ हे योगी आदित्यनाथ यांनी वारंवार सांगितले आहे. महाराष्ट्रात येऊनही त्यांनी जागे केले आहे. म्हणून मतदारांनी जागरूकपणे मतदान करावे. आपल्या व पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी जागे होण्याची हीच वेळ आहे. येत्या २० तारखेला सर्वांनी संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार व हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन आमदार फरांदे यांनी केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या