Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Political : आमदार सरोज आहिरेंच्या प्रचाराने विरोधकांना धडकी

Nashik Political : आमदार सरोज आहिरेंच्या प्रचाराने विरोधकांना धडकी

गावागावांतील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

देवळाली विधानसभेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या व महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे (Saroj Ahire) यांच्या जोरदार प्रचारामुळे त्यांच्या विरोधकांना जोरदार धडकी भरली आहे. मतदारसंघातील (Constituency) गावा-गावांत त्यांना उदंड प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचा विजय निश्चित असून ही काळ्या दगडावरची रेघच असल्याचा विश्वास मतदारच करू आहेत. आ. सरोज आहिरे यांनी विल्होळी, गौळाणे, आंबेबहुला, रायगडनगर, राजूर बहुला, सारूळ, बेलगाव ढंगा, तिरडशेत, वासाळी, तळेगाव (अं), जातेगाव, दहेगाव,पिंपळद (घो) या गावांमध्ये प्रचार रॅली काढली. यावेळी महिलां वर्गाकडून त्यांचे औक्षण केले गेले.

- Advertisement -

आ.सरोज आहिरे यांनी देवळाली मतरदारसंघाचा (Deolali Vidhansabha) बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास केला हे जनता जनार्दनने पाहिले आहे. पहिल्याच टर्ममध्ये तब्बल चौदाशे कोटींचा विकास करण्याची किमया आ. आहिरे यांनी केली. यापूर्वी मतदारसंघ विकासाच्या बाबतीत एकप्रकारे वनवासातच होता. मात्र आ. सरोजताई आहिरे यांनी विकासाचा वनवास संपुष्टात आणून मतदारसंघात विकासाची गंगा आणली. त्याचे आम्ही साक्षीदार असून अशाच वेगाने देवळालीचा विकास करायचा असेल तर आपल्याला आ. सरोज आहिरे यांच्याशिवाय पर्याय नाही, अशा भावना बुधवारी आ. आहिरे यांच्या गावभेटीदरम्यान मतदारांनी व्यक्त केल्या.

मतदारांकडून (Voters) मिळणारे प्रेम पाहून आ. आहिरे भारावून गेल्या आहेत. मतदारसंघाची सेवा ज्या माय-बाप मतदार जनतेने दिली त्याचे आपण सार्थक करू शकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. देवळाली मतदारसंघ राज्यात आणखी अग्रक्रमाने पुढे आणायचा असून पुन्हा संधी देण्याचे आवाहन आमदार आहिरे यांनी मतदारांना केले आहे. दरम्यान, बुधवारी आ. आहिरे यांनी करलेल्या प्रचार बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आलीरे कोण आली, देवळालीची विकासकन्या आली!, राष्ट्रवादीचा विजय असो, महायुतीचा विजय असो घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सरोजताईंशिवाय पर्याय नाही

देवळाली मतदारसंघाचा पाच वर्षांतील विकास हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे. कारण खऱ्या अर्थाने मतदारसंघात शाश्वत विकास हवा असेल तर आपल्याला आ. सरोजताई आहिरे यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना मतदारांकडून जाहीर व्यक्त करण्यात येत आहे. सरोजताई यांनी पाच वर्षांत संपूर्ण मतदारसंघाचा भौगोलिक माहिती घेत, कोणत्या गावात कोणत्या प्रकारची कामे होणे महत्त्वाची आहे हे जाणून घेत ठिकठिकाणी त्यांनी गाव, वाडे, राज्य महामार्गासारखी रस्त्यांची कामे करून दळणवळणाचे जाळे विणले. सोबतच इतरही पायाभूत विकास कामे मार्गी लावल्याचे मतदारांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या