Friday, November 15, 2024
HomeनाशिकNashik Political : देवळाली मतदारसंघात आ. सरोज आहिरेंचा झंझावात

Nashik Political : देवळाली मतदारसंघात आ. सरोज आहिरेंचा झंझावात

ताईंना विक्रमी मताधिक्य देणार, मतदारांकडून भावना व्यक्त

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

देवळाली विधानसभा मतदारसंघाचा (Deolali Assembly Constituency) खऱ्या अर्थाने विकासाचा कायापालट आ. सरोज आहिरे (Saroj Ahire) यांनी केला. राष्ट्रवादी अजित पचार गटाच्या व महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ. सरोज आहिरे यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी मतदार सरसावले आहेत. दरम्यान आ. आहिरे यांनी मतदारसंघात पहिल्या दिवसापासून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांना मतदारांचा सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने त्या पुन्हा विधानसभेवर (Vidhansabha) निवडून जाणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मतदार संघाच्या विकासासाठीच अजितदादांसोबत : ना. नरहरी झिरवाळ

मंगळवारी (दि.१२) आ. सरोज आहिरे यांनी मतदारसंघातील (Constituency) विविध गावांमध्ये प्रचाराचा झंझावात दिसून आला. यावेळी माजी खा. देवीदास पिंगळे, विष्णुपंत म्हैसधुणे, शीतल भोर, वंदना म्हैस धुणे, गायत्री नने, वंदना घोरपडे, सरपंच रामदास उगले, पुंडलीक म्हसधुने, साहेबराव म्हैसधुणे, शंकराच वायचळे, बबनराव म्हैसधुणे, शंकर भोर, सोमनाथ म्हैसधुणे, पुंजाराम घोरपडे, शिवाजी धोंगडे, बाळासाहेब म्हैसधुणे, जगन माळी, शंकर नवले, पंडित म्हैसधुणे, हिरामण म्हैसधुणे, बिलास आप्पा आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होते. महिलांनी आ. आहिरे यांचे औक्षण करत ताई पुन्हा तुम्हीच देवळालीच्या आमदार होणार असल्याचा आशीर्वाद दिला. तर उपस्थितांनी यंदा विक्रमी मताधिक्यांनी आ. आहिरे यांना विधानसभेवर पाठवणार असल्याचा शब्दच दिला.

हे देखील वाचा : Nashik Political : वसंत गिते विक्रमी मतांनी जिंकणार; शिवसेना उपनेते सुनील बागुल यांना विश्वास

गेली पस्तीस वर्षे देवळाली मतदारसंघात विकासाची (Development) उपेक्षा झाली होती. मात्र आ. सरोज आहिरे यांनी खऱ्या अर्थाने मतदारसंघाच्या गरजा, समस्या ओळखत गावोगावी विकासाची गंगा आणली. त्यामुळे मतदारसंघात विकासाचे नंदनवन झाले आहेत. म्हणून आ. सरोज आहिरे यांच्या प्रचाराचा ताफा देवळाली मतदारसंघातील कोणत्याही गावामध्ये (Village) पोहचताच महिला, ज्येछ नागरिक, तरुण अशी अबाल वृध्दांची गर्दी होत असून ताई पुन्हा तुम्हीच. अशी साद आ. आहिले यांना घातली जात आहे. दरम्यान आ. आहिरे यांनी ज्या गावांना भेटी दिल्या. त्यावेळी मतदारांशी संवाद साधत त्यांचीही मते जाणून घेतली.

हे देखील वाचा : माझ्यावर आणि विकासकामांवर जनतेचे प्रेम : आ.सीमा हिरे

मंगळवारी या गावांमध्ये प्रचार

गोवर्धन, गंगाव्हरे, सावरगांव, महादेवपूर, जलालपूर, चांदशी, वैष्णव नगर, देवरगांव, कश्यपनगर, धोंडेगांव, गाळोशी आदी गावांमध्ये सकाळी आठ ते रात्री सात दरम्यान आ. सरोज आहिरे यांच्याकडून जोरदार प्रचार करण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या