Tuesday, September 29, 2026
HomeनाशिकNashik Politics : कॅमेरा ऑन असल्याचे कळताच 'अण्णांनी' लावला डोक्याला हात; 'कट...

Nashik Politics : कॅमेरा ऑन असल्याचे कळताच ‘अण्णांनी’ लावला डोक्याला हात; ‘कट कर, घेऊ नको’ म्हणत केली सारवासारव

पंचवटी | वार्ताहर | Panchvati

कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सुरुवातीलाच गालबोट लागले. निर्धारित वेळेत कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग उपस्थित न झाल्याने काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. विशेष म्हणजे, सभात्याग करणाऱ्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या नगरसेवकांची (BJP Corporator) संख्या लक्षणीय होती.

- Advertisement -

यावेळी नगरसेवक दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनीही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. मात्र, आपण व्यक्त केलेले मत कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत असल्याची कल्पना त्यांना सुरुवातीला नव्हती. नंतर कॅमेरा ऑन असल्याचे लक्षात येताच त्यांनी डोक्याला हात लावत, “अरे, कट कर… घेऊ नको, घेऊ नको…” असे म्हणत प्रतिक्रिया दिली.

आयोजित बैठकीतील (Meeting) नाराजी, त्यात भाजप नगरसेवकांचा सभात्याग आणि त्यानंतर कॅमेऱ्याची (Camera) झालेली जाणीव यामुळे आण्णांची चांगलीच पंचाईत झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. आपले वक्तव्य वरिष्ठांपर्यंत पोहोचू नये, याचीच चिंता त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त झाल्याची कुजबुजही बैठकीनंतर ऐकायला मिळाली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...