Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Political : सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी मला साथ द्या - आ. नितीन...

Nashik Political : सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी मला साथ द्या – आ. नितीन पवार

सुरगाणा तालुक्यातील गाव भेट संवाद दौरा, ठिकठिकाणी स्वागत

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पाणी मात्र अरबी समुद्राला वाहून जाते. नदी नाल्यावर सिमेंट बंधारे लहान धरणे बांधून हेच पाणी स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल यासाठी आपण सुरगाणा तालुक्याचा कृती आराखडा तयार केला असून सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी मला साथ आणि आशीर्वाद द्या आपले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी दिला.

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) चिंचपाडा, अशोक नगर, शिवपाडा, हट्टी, करवंदे, दुर्गापूर जामने माळ, बाळ ओझर, मोठे माळ, श्रीभुवन, भर्डा, तळपाडा, करंजाळी, नवापूर, भधर, मोठीचा गावठा, सातबाभळ, भवान दगड, उमरेमाळ, हनुमंत माळ, ठाकरे पाडा, उंबर गव्हाण, राहुडे या गावात आमदार नितीन पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते समवेत निवडणूक प्रचारार्थ भेट देऊन संवाद मतदार व महिला भगिनीशी साधला साधला.राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार यांनी गावागावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. फटाक्याच्या अतिशबाजीत स्वागत झाले.

आमदार नितीन पवार पुढे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांत दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मतदार संघ विकासासाठी आणला. लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojna) कळवण व सुरगाणा तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे १ लाखाहून अधिक महिलांना फायदा झाला महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aagahdi Government) लाडकी बहिण योजनेवर भरपूर टिका केली. पाच महिन्यांचे पैसे खात्यात पडल्याने विरोधकांची बोलती बंद झाली असून शेतक- यांसाठी मोफत वीज, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून स्टायपेंड सुरु केले. पेसा भरती असे धाडसी निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकारने घेतले असून राज्यात पुन्हा सत्ता येण्यासाठी मला साथ द्या असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) आमदार नितीन पवार यांनी सांगितले की विरोधकांनी भोळ्या भाबड्या आदिवासी जनतेची फसवणूक केली. ४० वर्षात असंख्य मोर्चे काढले. पदरी काही पडले नाही. तालुक्यात लहान धरणे बांधून शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन दिले जाईल. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पाठीशी उभे रहा. विकासाची आश्वासने पूर्ण करणा-याच्या पाठीशी रहा. वन जमिनीचा स्वतंत्र सातबारा करण्याचे आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सुरगाणा येथील सभेत दिले आहे त्यांची पूर्तता व पाठपुरावा करण्यासाठी मला साथ द्या असे आवाहन आमदार पवार यांनी केले.

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पवार, गोपाळ धूम, नवसू गायकवाड, राजू पाटील,, भास्कर अलबाड, आनंदा झिरवाळ, तुळशीराम महाले, युवराज लोखंडे, हरिभाऊ भोये, मनोज शेजोळे, योगेश ठाकरे, पुंडलिक खंबायत, रामदास केंगा, दीपक मेघा, रमेश बागुल सह गाव, वाडी, वस्ती पाड्यावरुन बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या