Friday, April 25, 2025
HomeराजकीयNashik Political : आ. आहिरे यांना शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा; देवळाली मतदारसंघात...

Nashik Political : आ. आहिरे यांना शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा; देवळाली मतदारसंघात नाट्यमय घडामोडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवळाली विधानसभा मतदारसंघातील (Deolali Assembly Constituency) महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) यांना शिवसेना शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धी पत्र काढले आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमदार सरोज यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा लागणार आहे. शिंदे गटाने पाठिंबा दिल्यामुळे आमदार सरोज आहिरे यांच्या ताकतीत निश्चितपणे भर पडणार आहे. अशी चर्चा केली जात आहे.

- Advertisement -

आमदार सरोज आहिरे या महायुतीच्या अधिकृत उमेदवार (Candidate) आहेत. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट तसेच रिपाई आठवले गटासह आदी विविध पक्षांचा समावेश आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाने अपक्ष उमेदवार राजश्री अहिरराव यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे महायुतीत बंडाळी असे चित्र दिसून आले.

परंतु वरिष्ठ स्तरावर झालेल्या राजकीय चर्चेनंतर शिवसेना शिंदे गटाने राजश्री अहिराव (Rajshree Ahiraor) यांच्या ऐवजी विद्यमान आमदार तसेच महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धी माध्यमांसाठी पत्रक काढून पाठिंबा जाहीर केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...