Thursday, November 7, 2024
HomeनाशिकNashik Political : पूर्वतून मविआचे गणेश गिते निवडून येणार - गायकवाड

Nashik Political : पूर्वतून मविआचे गणेश गिते निवडून येणार – गायकवाड

नाशिकरोड परिसरात भेटीगाठींना वेग, मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (Nashik East Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) तसेच महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश (भाऊ) गिते (Ganesh Gite) यांनी नाशिकरोड, जेलरोड भागात मतदारांच्या (Voters) गाठीभेटी घेतला. यावेळी शिवसेना उबाठा नेते नेते दत्ता गायकवाड प्रचारात सहभागी झाले. यावेळी मतदारांना आवाहन करताना पूर्वतून महाविकास आघाडीचे गणेश गितेच निवडून येतील, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी गिते यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : पूर्वसाठी ॲड. ढिकलेंचे नेतृत्व आवश्यक; प्रचार दौऱ्यात संभाजी मोरूसकर यांचे प्रतिपादन

नाशिकरोड भागात (Nashik Road Area) गितेंनी मतदारांच्या भेटीगाठी घेत तेथील समस्या जाणून घेतल्या. नाशिकरोड, पंचवटीच्या विकासासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे व सर्व भागात समतोल राखणे हाच आपला अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांनीदेखील गिते यांना निवडून आणणार असल्याची खात्री दिली. स्थायी समिती सभापती असताना करोना काळात गणेश गिते यांनी केलेल्या अनेक विधायक कामांचा नागरिकांनी गौरव केला. पुढील काही दिवसांत गिते यांच्या प्रचाराचा झंजावात आणखी वाढेल, असे चित्र आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : आनंदवल्ली, गंगापूरमधून सीमा हिरेंना मोठे मताधिक्य मिळणार – कडलग

प्रचार कार्यालयाचा आज शुभारंभ

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार गणेश गिते यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ उद्या बुधवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजता दत्तमंदिर चौक येथे होणार आहे.

२) गणेश गितेंना जगदीश गोडसेंचे बळ

पंचवटी | प्रतिनिधी

नाशिक पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी (शप) पक्षाचे उमेदवार गणेश गिते यांनी प्रेस कामगार संघटनेचे नेते जगदीश गोडसे (Jagdish Godse) यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. गोडसे आता प्रचारात सक्रिय होणार आहेत. त्यामुळे गिते यांना चांगले बळ मिळणार आहे.

हे देखील वाचा : गुरुदेव कांदे यांच्या प्रचाराचा नांदुर्डीत शुभारंभ

राष्ट्रवादी (शप) पक्षाकडून जगदीश गोडसे आणि आडगावचे (Adgaon) युवा नेते अतुल मते इच्छुक होते. मात्र, पक्षाने मनपाचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांना संधी दिली. गिते यांनी आज गोडसे यांच्या जेलरोड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

हे देखील वाचा : ना.झिरवाळ कॅबिनेटमंत्री होतील : तांबडे

त्यानंतर जगदीश गोडसे यांची नाराजी दूर झाली असून, ते लवकरच प्रचारात सक्रिय होणार आहेत. गोडसे गेल्या ५-७ वर्षांपासून मतदारसंघात विविध उपक्रमातून कार्यरत झाले आहेत. प्रेस कामगारांसोबतच त्यांचा नातेसंबंध आणि मित्रपरिवारदेखील मोठा आहे. गोडसे यांच्या जनसंपर्काचा फायदा गिते यांनी होणार आहे.

पूर्ण ताकदीने गणेश गिते यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. दोन-तीन दिवसांत उमेदवार गिते यांच्यासह प्रेस कामगारांच्या गाठीभेटी घेणार आहे. नाशिकरोड, जेलरोड आणि पंचवटीतसुद्धा गिते यांच्यासोबत लवकरच मतदारांशी संवाद साधणार आहे.

जगदीश गोडसे, सरचिटणीस, नाशिकरोड प्रेस मजदूर संघ

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या