नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिकनिवडणुकीसाठी (Nashik Municipal Corporation Eelction) उमेदवारी अर्ज मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या माघारी प्रक्रियेत एकूण ६८९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, आता शहरातील ३१ प्रभागांमधील १२२ जागांसाठी १,३९० उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
छाननी प्रक्रियेत दाखल झालेल्या २,३५६ नामनिर्देशन अर्जापैकी २७७ अर्ज अवैध ठरविण्यात आले होते, तर २०७९ अर्ज वैध घोषित करण्यात आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या माघारी प्रक्रियेत पहिल्या दिवशी ५४ उमेदवारांनी, तर शुक्रवारी (दि.२) दुसऱ्या व अतिम दिवशी ६३५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळाल्या. माघारी प्रक्रियेदरम्यान शहरातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये सकाळपासूनच उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी होती.
अनेक प्रभागांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय चर्चा, आणि रणनीती आखली जात असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी पक्षांतर्गत समन्वय, तर काही ठिकाणी आघाडीयुतीच्या गणितामुळे उमेदवारांनी (Candidate) माघार घेतल्याचे समजते. माघारीनंतर अनेक प्रभागांतील लढती तुलनेने स्पष्ट झाल्या असून, काही प्रभागांत अजूनही बहुकोनी लढती होण्याची शक्यता कायम आहे.
दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने रिंगणात असल्याने यंदाची महापालिका निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव, युती-आघाडीबाबतची (Yuti and Aagahdi) संभ्रमावस्था आणि अधिकृत उमेदवारांच्या घोषणांना उशीर यामुळे अनेक प्रभागांमध्ये बंडखोरीचे चित्र स्पष्ट झाले.
हायव्होल्टेज ड्रामा – कुठे राडा तर कुठे बंडखोरी
काही प्रभागांत पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतरही नाराज इच्छुकांनी माघार न घेता अपक्ष म्हणून मैदानात राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. एबी फॉर्मसाठी भाजपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला होता. प्रभाग २५ मधून सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर आणि मुलगा दीपक बडगुजर यांनी माघार घेतल्याने व गिरीश महाजनांच्या मध्यस्थीने भाजपतर्फे उमेदवारी रद्द झालेल्या भाग्यश्री ढोमसे यांना दिलासा मिळाला. त्यांना भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दीपक बडगुजर आणि भाजपची उमेदवारी रद्द झालेले मुकेश शहाणे यांच्यात थेट लढत बघायला मिळणार आहे. सातपूर परिसरात उमेदवारी माघारीच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या माजी मंडल अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, पक्षनिष्ठा कायम ठेवत त्यांनी पक्षाच्या हितासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे स्पष्ट केले. एकूण ६९ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, यामध्ये तीन माजी नगरसेविका तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठी गर्दी दिसून आली होती; मात्र माघारीसाठी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, भाजपकडून तिकीट मिळालेल्या दोन उमेदवारांपैकी अर्ज अग्रक्रमाने नसल्याने उमेदवारी बाद झालेल्या जानवी तांबे यांनीही अर्ज मागे घेतला. यावेळी त्यांनी पक्षातील उमेदवारी प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक ११ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यामध्ये सध्या कारागृहात असलेले प्रकाश लोंढे यांचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातपूर विभागातील बहुतांश प्रभागांमध्ये प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत दिसून येत असून, उमेदवारी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र नसल्याने उमेदवारी बाद झालेल्या जानवी तांबे यांनीही अर्ज मागे घेतला. यावेळी त्यांनी पक्षा अधिक स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक १४ ड मधून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या नंदू कहार यांनी उमेदवारी माघारीसाठी दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. नाशिक मध्यच्या आमदार यांच्याकडून आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा दावा कहार यांनी केला आहे. मात्र, या दबावाला न जुमानता आपण उमेदवारी अर्ज माघारी घेणार नसल्याचा ठाम पवित्रा त्यांनी घेतल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कहार यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपकडून कोणताही अधिकृत उमेदवार देण्यात आ लेला नाही. आपण उमेदवारीसाठी प्रयत्न करूनही विचार झाला नाही. शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आर्थिक प्रलोभन देत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, सामाजिक पाठबळामुळे आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ‘क’मधून त्यांच्या पत्नीने समाजाच्या हितासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याचे जाहीर केले.
प्रभाग तीनमध्ये भाजपने माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे रुची कुंभारकर यांनी अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले होते. सानप यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर इतर उमेदवारांनी माघारी घ्यावी, यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू झाले. यांचाही समावेश होता. शुक्रवारी सकाळपासून त्यांची सतत समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांचा ठाम विरोध असल्यामुळे निर्णय पुढे ढकलला जात होता. दरम्यान, माधारीची वेळ संपायला थोडाच अवधी असताना सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुंभारकर यांना विभागीय कार्यालयात आण-ले. यावेळी एका कार्यकर्त्याने मोठ्याने आक्षेप नोंदवत “भाऊ, माघार घेऊ नका; ते घाबरले आहेत,” अशी प्रतिक्रिया दिल्याने वातावरण तापले. या प्रकारामुळे कुंभारकर भावूक झाल्याचेही दिसून आले. नंतर सानप यांनी त्यांना कार्यालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; परंतु जिन्यात असतानाच माघारीची अधिकृत वेळ संपल्याची घोषणा झाली. त्यानंतर पोलिस आणि कर्मचाऱ्यांना विनंती करूनही कार्यालयाचे दार उघडण्यात आले नाही आणि कुंभारकर समर्थकांसह परतले. यामुळे कुंभारकर अपक्ष उमेदवार म्हणूनच रिंगणात राहणार असून, मच्छिंद्र सानप यांच्यासमोर मतविभागणीचे संकट अधिक गडद झाले आहे.





