Saturday, January 24, 2026
HomeनाशिकChhagan Bhujbal : "अधिकारी काम करत नसतील तर..."; मंत्री भुजबळ संतापले

Chhagan Bhujbal : “अधिकारी काम करत नसतील तर…”; मंत्री भुजबळ संतापले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकचे (Nashik) प्रवेशद्वार असलेल्या द्वारका चौकातील (Dwarka Chowk) सतत होणारी कोंडी मुंबईच्या हाजी अली पॅटर्नप्रमाणे दूर करण्याचा प्रयत्न करुन लवकरच द्वारका वाहतूक कोंडीमुक्त चौक होणार, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. आज सकाळी ११ वाजता त्यांनी येथील चौकाची पाहणी केली.

- Advertisement -

यावेळी भुजबळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह (NMC Officer) पोलीस प्रशासन तसेच नॅशनल हायवे अथोरिटीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. तसेच यंत्रणेनेने आपले काम व्यवस्थित करावे, अशी तंबी देखील त्यांनी दिली. जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलून चालणार नाही, मी नाशिककर म्हणून या ठिकाणी आलो आहे, मंत्री म्हणून नाही. आपलं शहर चांगलं रहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

YouTube video player

पुढे ते म्हणाले की, “मागील अनेक महिन्यांपासून (Month) मी येथील बेट काढून हा मार्ग मोकळा करा अशी मागणी करीत होतो. हाजी अली पॅटर्न प्रमाणे येथील वाहतूक कोंडी सुटेल. बेट काढायला मात्र आता मुहूर्त लागले आहे. दरम्यान पोलिसांनी देखील चोखपणे आपले कामगिरी करावी. उड्डाणपुलावरून मोठ्या गाड्या आल्यावर त्यांना खाली आल्यावर दंडासाठी न थांबवता पोलिसांनी उड्डाणपुलावर जाऊन कारवाई करावी, असेही भुजबळ यांनी म्हटले.

तसेच भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी दोन दिवसापूर्वी महापालिका मुख्यालयात बैठक घेऊन सर्व यंत्रणांना विशेष करून महापालिकेला चौक अतिक्रमण मुक्त करण्याची सूचना केली होती. त्याला छगन भुजबळ यांनी दुजोरा देत येथील हातगाड्या, बेशिस्त पार्किंग हे सर्व काढण्याचे आदेश दिले. तसेच रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार पोलीस ॲक्टप्रमाणे पोलिसांनाही (Police) देण्यात आलेले आहे, याची जाणीव भुजबळ यांनी करून देत पोलिसांवरही कारवाई करण्याची सूचना केली.

भुजबळ अधिकाऱ्यांवर संतापले

छगन भुजबळ यांनी मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाण पुलाखाली भिक्षेकरी ठाण मांडून असतात, सर्व्हिस रोडवर अतिक्रमण आहेत. याबाबत विचारणा केली असता मनपाच्या अधिकाऱ्यांनी हे आमचे काम नाही, असे उत्तर दिले. त्यावरून
मनपा अधिकाऱ्यांवर भुजबळ चांगलेच संतापले. तसेच मी मुंबई महापालिका सांभाळली आहे, कोणाचे काय काम हे मला चांगले माहीत आहे. अधिकारी काम करत नसतील तर मी स्वतः रस्त्यावर उतरतो, असा थेट इशारा भुजबळ यांनी दिला.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...