Monday, October 19, 2026
HomeनाशिकNashik MC News : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक लांबणीवर; कारण काय?

Nashik MC News : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक लांबणीवर; कारण काय?

नाशिक | Nashik

महापालिकेच्या (Municipal Corporation) स्वीकृत नगरसेवकांची निवड बुधवार (दि.२१ ऑक्टोबर) रोजी होणार होती. मात्र, आता ही निवडणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) लवकरच करणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना स्वीकृत नगरसेवकांच्या नावासाठी विचार करण्याकरिता आणखी वेळ मिळाला आहे.

- Advertisement -

दरम्यान महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची (Nominated Corporator) निवडणूक आता २१ ऐवजी १४ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. तर निवडणूक लांबणीवर गेल्याने स्वीकृत नगरसेवक पदाची नावे देण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. दुसरीकडे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांची निवड जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपपासून शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसपर्यंत सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे बैठकांचा जोर वाढला आहे. नेत्यांच्या नातलगांना संधी देण्याच्या चर्चेने निष्ठावंत कार्यकत्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच काही पदाधिकारी पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडे सहा जागांसाठी शेकडो इच्छुक

महापालिकेत भाजपचे (BJP) ७२ नगरसेवक असल्याने स्वीकृतच्या दहा जागांपैकी सहा जागा त्यांच्या वाट्याला येणार आहेत. या सहा जागांसाठी शेकडो इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. पालकमंत्र्यांपासून स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या मुला-मुलींची नावे चर्चेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. निवडणुकीत पक्षासाठी काम केलेल्यांना संधी देण्याऐवजी राजकीय वजन आणि कौटुंबिक संबंधांच्या आधारे निवड झाल्यास संघटनेतील निष्ठावंतांवर अन्याय होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

संघटनात्मक योगदान आणि राजकीय अनुभव या निकषांवर निवड करण्याची अपेक्षा

शिवसेना (उबाठा) पक्ष व काँग्रेस (Congress) यांच्या गटाला दोन जागा येत आहे. या दोन जागांसाठी नावांची चाचपणी सुरू आहे. मात्र, चर्चेतील एका नावावरून पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत प्रत्यक्ष काम करणार्‍यांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. शिंदे सेनेतही इच्छुकांची गर्दी शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा येणार असल्या, तरी इच्छुकांची संख्या मोठी आहे. पक्षासाठी केलेले काम, संघटनात्मक योगदान आणि राजकीय अनुभव या निकषांवर निवड व्हावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ​एआयच्या मदतीने केले ३८ गुन्हे; दहावी पास...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त वर्क इंडिया (Work India) या नोकरीविषयक संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल तयार करून राज्यभरातील तरुणांना लाखाे रुपयांचा गंडा...