Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik Politics : प्रसाद हिरे यांचा गीतांजलीसह आज भाजपत प्रवेश

Nashik Politics : प्रसाद हिरे यांचा गीतांजलीसह आज भाजपत प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक व मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती प्रसाद हिरे (Prasad Hiray) व पत्नी गीतांजली हिरे यांच्यासह समर्थक आज, मंगळवारी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजपच्या नरीमन पॉइंट येथील कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी हा सोहळा होणार आहे.

- Advertisement -

या सोहळ्यासाठी मालेगावातून ३०० पेक्षा अधिक वाहनांनी कार्यकर्ते सकाळी मुंबईला (Mumbai) रवाना होणार आहेत. हिरे दाम्पत्याच्या भाजप प्रवेशामुळे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे वर्चस्व स्थापन होण्यास बळ मिळणार आहे.

प्रसाद हिरे हे कै. भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट या अग्रगण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आरोग्य मंत्री डॉ. बळीराम हिरे यांचे चिरंजीव आहेत, ते यापूर्वी भाजपत होते. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते यापूर्वी त्यांनी दाभाडी मतदार संघातून निवडणूक (Election) लढवली होती. तर गीताजली हिरे या कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्येष्ठ नेते बाळासाहेब देसाई यांच्या नात आहेत. विद्यमान पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांच्या आते बहीण आहेत. दोघा दिगजांच्या भाजप प्रवेशामुळे कसमादे प‌ट्ट्यात भाजपला चांगलेच बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...