Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : "दिंडोरीत पुढील वेळी भाजपचा आमदार..."; चारोस्करांनी पक्षाचा झेंडा हाती...

Nashik Politics : “दिंडोरीत पुढील वेळी भाजपचा आमदार…”; चारोस्करांनी पक्षाचा झेंडा हाती घेताच महाजनांनी डाव टाकला

नाशिक | Nashik

जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP Sharad Pawar) मोठा धक्का बसला आहे. २०२४ साली ‘तुतारी’ चिन्हावर दिंडोरी विधानसभा निवडणुकीतून निवडणूक लढविलेल्या सुनिता चारोस्कर यांनी त्यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्करांनी आपल्या समर्थकांसह आज (दि.३) रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनिता चारोस्कारांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठे विधान केले आहे.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “भाजप (BJP) हा सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. यात घराणेशाही कुठेही दिसत नाही. मोदीजी हे तीन वेळा देशाचे नेतृत्व करत आहे. मी देखील सात वेळा आमदार आहे. त्यामुळे येथे सर्वांना संधी मिळणार आहे. रामदास चारोस्कर (Ramdas Charoskar) साहेब हा तुमचा शेवटचा प्रवेश असून, आता कुठेही जाऊ नका. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काम सुरू करू असा शब्द दिला आहे. त्यामुळे चमत्कार करून सर्व उमेदवार निवडून आणा. दिंडोरीत रस्त्यांचा प्रश्न गंभीर असून, पुढच्या वेळी याठिकाणी भाजपचा आमदार द्या”, असे त्यांनी म्हटले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ते पुढे म्हणाले, “लोकसभेला (Loksabha) आपल्याला थोडा फटका बसला पंरतु, विधानसभेला यश मिळाले. देवेंद्र फडणवीस हे खंबीर नेतृत्व आपल्या सोबत आहे. आगामी निवडणुकीत आपल्या विचाराचे सदस्य निवडून आणा, आम्ही विकास कसा करतो ते बघा. अवकाळीमुळे नाशिकच्या अनेक भागात पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून शेतकर्‍यांसाठी ३२ हजार कोटींची मदत करण्यात आली आहे. सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीर उभे असून, त्यांना रस्त्यावर सोडणार नाही”, असेही महाजन यांनी म्हटले.

राऊतांना टोला

यावेळी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपल्या भाषणात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, “आता सकाळचा भोंगा बंद झाला आहे. त्यांच्यावर मी जास्त बोलत नाही माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीत अक्षय कर्डिले ?

0
अहिल्यानगर | Ahilyanagar एका एक्झिट पोलनुसार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना सव्वा ते दीड लाख मतदान पडण्याची शक्यता आहे.एकूण झालेल्या मतदानाचा विचार...