Tuesday, May 26, 2026
HomeनाशिकNashik Politics : महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन; नाशकात प्रचाराचा नारळ फोडणार

Nashik Politics : महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन; नाशकात प्रचाराचा नारळ फोडणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर महायुतीने प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गुरुवारचा मुहुर्त निश्चित केला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करुन दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जाहीर सभा ठक्कर मैदान येथे होणार आहे. सभेची जय्यत तयारी महायुतीने केली आहे.

- Advertisement -

ठक्कर मैदान, एबीबी सर्कल, त्र्यंबक रोड, नाशिक (Nashik) येथे हा कार्यक्रम होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री नरहरी झिरवाळ, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. एकूण पाच हजार ६५७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन फडणवीस करणार आहेत.

रामकुंड परिसरातील विकासकामांचे भूमीपूजन

नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड भागातील विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा गुरुवारी सकाळपासून नाशिकमध्ये नियोजित असून, सकाळी ११.१५ वाजता रामकुंड परिसरात विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री श्री पंचवटी येथील प्रमुख धार्मिक स्थळांची पाहणी करून स्थानिक पदाधिकारी व अधिका-यांशी चर्चा करतील. रामकुंड परिसरात सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, तसेच सिंहस्थपूर्व नियोजनाशी संबंधित विविध प्रकल्पांचे काम सुरू असून, या प्रकल्पांच्या भूमीपूजनामुळे परिसरातील धार्मिक पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

ताज्या बातम्या

अनैतिक

Nashik Crime News: अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून विवाहित प्रेयसीनेच प्रियकराचा...

0
पंचवटी | प्रतिनिधीपंचवटी परिसरातील पेठरोडवर एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारे हत्याकांड उघडकीस आले आहे. अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून एका ३६ वर्षीय विवाहित...