Friday, April 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : महाविकास आघाडीचे 'महागठबंधन' ; नाशिकमध्ये मनसेसह सर्वपक्षीय मोट बांधली,...

Nashik Politics : महाविकास आघाडीचे ‘महागठबंधन’ ; नाशिकमध्ये मनसेसह सर्वपक्षीय मोट बांधली, आगामी निवडणुका एकत्र लढण्याची केली घोषणा

नाशिक | Nashik

राज्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडी नाशिकमध्ये (Nashik) घडत असून, सर्वपक्षीय महागठबंधन जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) डावे पक्ष काँग्रेस व मनसेचे प्रतिनिधी एकत्र आले. या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे.

- Advertisement -

राज्याच्या राजकारणात (Politics) ही बैठक आदर्श गठबंधनची सुरुवात मानली जात आहे. मनसेसह (MNS) सर्व पक्ष एकत्र आल्याने राज्यात नव्या राजकीय समीकरणांची तयारी सुरू झाली आहे. नाशिकमध्ये (Nashik) उभारलेले हे महागठबंधन राज्याच्या पातळीवर ‘महायुती’ला थेट आव्हान देणारे ठरणार, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सर्वपक्षीयांची मोट बांधत नाशिक जिल्ह्यात (Nashik District) महागठबंधनाची सर्वात ठोस आणि प्रत्यक्ष सुरुवात करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मनसेचा (MNS) सहभाग ही या बैठकीतील सर्वात मोठी राजकीय घडामोड मानली जात असून, महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, या बैठकीस मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, माकपा प्रदेश सरचिटणीस तानाजी जायभावे, मनसे उपनेते सलीम शेख, मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माकपा प्रदेश सचिव राजू देसले,  राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गजानन शेलार, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी, काँग्रेसचे ज्ञानेश्वर गायकवाड, माकपा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल.कराड, काँग्रेसचे प्रशांत दिवे, सिटूचे  सीताराम ठोंबरे, माजी आमदार वसंत गीते, गोकुळ पिंगळे, शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश गीते, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपविरोधात महाएकजूट जनतेच्या न्यायासाठी

यावेळी नेत्यांनी एकमुखाने सांगितले की, राज्यात गेल्या चार वर्षांत भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची मनमानी आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष वाढले आहे.१४ कोटी जनतेच्या प्रश्नांना बगल देऊन फडणवीस यांनी एक हाती सत्ता केंद्रित के ली आहे. राज्याचे दिवाळे निघाले असून, नागरिकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर, निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने मतदार यादीतील दुबार नावे तात्काळ वगळण्याची आणि मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली.

ताज्या बातम्या

बारामती

Baramati Rahuri Election: बारामती, राहुरीत काँग्रेस उमेदवार उतरवणार; हायकमांडकडून ग्रीन सिग्नल

0
मुंबई | Mumbaiउपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. ही...