Saturday, May 30, 2026
HomeनाशिकNashik Politics : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये 'या' तारखेला संयुक्त मोर्चा

Nashik Politics : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त मोर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरात (City) एमडी ड्रग्ज, कोकेन, दरोडे, महिलांवर अत्याचारांसह गुन्हेगारी वाढत आहे. तसेच हनीट्रॅप प्रकरणामुळे देखील नाशिक बदनाम होत आहे. त्यामुळे हनीट्रॅपची चौकशी करण्यासह इतर मागण्यांसाठी मनसे आणि शिवसेना (उबाठा) (MNS Shivsena UBT) पक्षाच्या वतीने (दि.१२ सप्टेंबर) रोजी अनंत कान्हेरे मैदानापासून संयुक्त मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी दिली.

मनसेच्या शहरातील ‘राजगड’ येथील कार्यालयात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर मनसे आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. यावेळी माजी नगरसेवक सलिम शेख, जिल्हाध्यक्ष अंकूश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मोर्चा विषयी माहिती देतांना पाटील यांनी सांगितले की, शहरातील पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा, रस्त्यांचे निकृष्ट काम, वर्षभरापासून रस्त्यांमधील वाढते खड्डे, पालिकेच्या रूग्णालयांमध्ये औषधांची कमतरता, ढासळलेले कचरा व्यवस्थापन, गॅस लाइन कामांमुळे गल्ली गल्लीत चिखल आणि त्रास, काळ्या यादीतील ठेकेदारांना पुन्हा देण्यात येत असलेली कामे, स्मार्ट सिटीसह कुंभ प्रकल्पाची ऑडिट चौकशी, कुंभमेळ्याच्या जिल्ह्यातील शेती, शेतकऱ्यांचे प्रश्नांसह कर्जमाफीचे प्रलंबित प्रकरणे, पिकविमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी करणे यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रभाग रचनेत फेरफार

महानगरपालिका निवडणूक (NMC Election) व प्रभाग रचना नियमानुसार करण्यात आली नसून सत्तेसाठी त्यात फेरफार करण्यात आल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सत्तेसाठी राजकीय हेतून ओढाताण करण्यात आली असून, सर्वसामान्य मतदारांवर अन्याय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

१४ ऑगस्टपासून २२ विभागनिहाय बैठका

संयुक्त मोर्चाच्या (Morcha) तयारीसाठी पदाधिकारी, समर्थकांना माहिती देण्यासाठी १४ ऑगस्टपासून ते १० सप्टेंबरपर्यंत २२ बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १४ ऑगस्ट रोजी नाशिक पूर्व आणि नाशिकरोडची बैठक होईल. तर १५ ऑगस्ट रोजी नाशिक पूर्व, पंचवटी,१७ ऑगस्ट रोजी नाशिक पश्चिम, सिडको, १८ ऑगस्ट रोजी नाशिक पश्चिम, सातपूर, १९ ऑगस्ट रोजी नाशिक मध्य-पूर्व आणि २० ऑगस्ट रोजी नाशिक मध्य व पश्चिमची बैठक होणार आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...