Saturday, May 30, 2026
HomeनाशिकNashik Politics : बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित! विरोधकांना गप्प बसण्याशिवाय पर्याय...

Nashik Politics : बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित! विरोधकांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) हकालपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांचा भाजप (BJP) प्रवेश जवळपास आता निश्चित मानला जात आहे. बडगुजर विरोधकांना आता राग गिळून घेणाशिवाय पर्याय राहिलेला नाही. यातून पक्षांतर्गत ब गट स्थापन होईल, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आ. सीमा हिरे यांचा बडगुजर यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध कायम आहे. त्यांचे समर्थक त्यासाठी सज्ज झाले आहेत.

नाशिकच्या पूर्व व मध्य विधानसभेच्या दोन्ही आमदारांनीही सीमा हिरे (Seema Hiray) यांना साथ दिली आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर व भाजपकडून सीमा हिरे यांच्यात विधानसभेला लढत झाली होती. त्यात सीमा हिरे यांनी बडगुजर यांचा पराभव केला होता. त्यावेळी दोघांमध्ये टोकाचा संघर्ष दिसला होता. त्यामुळे बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास हिरे यांच्या राजकीय स्थानाला धक्का लागू शकतो.

तसेच सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची गेल्या २० वर्षांची राजकीय कारकीर्द पाहता ते भाजपातही निश्चित वरचढ होतील. अशीही भीती व्यक्त होत आहे. मात्र भाजपाचे संकटमोचन गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा वरदहस्त बडगुजरांवर असल्याने आता कितीही राग असला तरी तो गिळून बसण्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीव विरोधकांना झाली आहे. पक्ष प्रवेशामागे स्थानिक नेत्यांनी सुपारी घेतल्याचा आरोपही खासगीत केला जात आहे. मात्र प्रवक्त्यांचे वरिष्ठ पातळवरील संबंध पाहता उघड पंगा घेण्याची हिंमत कोणीही दाखवत नाही.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...