Sunday, October 4, 2026
HomeराजकीयNashik Politics : मोठी बातमी! सुधाकर बडगुजरांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी

Nashik Politics : मोठी बातमी! सुधाकर बडगुजरांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी

नाशिक | प्रतिनिधी |  Nashik 

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून (Shivsena UBT Party) हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आणि जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात बडगुजर यांच्या हकालपट्टीचे स्वागत केले.

- Advertisement -

सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती यावेळी दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आमचा पक्ष आदेशावर चालतो असे म्हणत गायकवाड यांनी भर पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा फोन आल्याचे सांगत बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा केली.

दरम्यान, कालच सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी (Media) बोलतांना पक्षात संघटनात्मक बदल झाल्यापासून पक्षात  अनेकजण नाराज आहेत. तसेच माझी नाराजी कोणावरही नसून स्वतःवरच आहे, असे म्हटले होते. त्यानंतर अखेर आज ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

ताज्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad BJP List : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची...

0
मुंबई | Mumbai भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची (Candidate) घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि...