Friday, June 19, 2026
HomeनगरSangamner : सरळ रेल्वेमार्गासाठी राजकारण विरहित आग्रह धरावा लागणार

Sangamner : सरळ रेल्वेमार्गासाठी राजकारण विरहित आग्रह धरावा लागणार

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर असंतोषाचे वातावरण

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

मुंबई-नाशिक-पुणे हा गोल्डन ट्रँगल असून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाकरीता (Nashik-Pune Railway Line) आपण सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी सर्व काम पूर्ण होऊन भूसंपादनाची (Land Acquisition) सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही शेतकर्‍यांना देण्यात आली. आता मात्र वेगळी कारणे सांगितली जात आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाबाबत केलेले विधान हे अत्यंत दुर्दैवी असून या विभागाच्या विकासाकरीता हा सरळ मार्ग होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले असून भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी राजकारण विरहित आपल्या सर्वांना सरळ रेल्वेमार्गासाठीच आग्रह धरावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द केल्याचे विधान नुकतेच केले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील उत्तर भागांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री थोरात म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वेबाबत (Nashik-Pune Railway) केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी केलेले वक्तव्य या विभागासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबई-नाशिक-पुणे हा गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखला जातो. विकासाच्या दृष्टीने हा ट्रँगल देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरीता नाशिक-पुणे रेल्वे होणे अत्यंत गरजेचे आहे.

याकरीता आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्यादृष्टीने कामही झाले. रेल्वेसाठी जमिनी भूसंपादित करून सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही देण्यात आली. असे सगळे झाले असताना आता मात्र जीएमआरटी आणि अन्य गोष्टी सांगितल्या जात आहेत. यावरून हा रेल्वे मार्ग रद्द केल्याचे सांगितले जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. नवीन मार्गदर्शक सूचवला आहे त्या मार्गातून उपलब्धी काय किंवा त्याचा फायदा काय असे विचारले असता तर काहीही दाखवता येणार नाही. म्हणून नाशिक-पुणे रेल्वे ही सरळ मार्गे झाली पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे.

हा विषय निवड आजच्या राजकारणाचा नाही किंवा कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा नाही. राजकारणापलीकडे जाऊन विकासाच्या वाटचालीसाठी सरळ रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे. पिढ्यानपिढ्यांच्या भविष्यासाठी आणि या विभागाच्या समृद्धीसाठी गोल्डन ट्रँगल जोडणारा हा सरळ रेल्वेमार्ग झाला पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे आणि याकरीता सातत्य ठेवून ते मंजूर करून घ्यावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

नाशिक-पुणे या मेट्रो शहरांना जोडण्यासाठी सरळ रेल्वे मार्ग व्हावा याकरीता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करून हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना पैसे दिले गेले. मात्र नवीन सरकार आले आणि मार्ग बदलण्याचा घाट घातला गेला. याबाबत या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेला घेऊन आपण संघर्ष समिती तयार केली. माजी मंत्री थोरात यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली तर आपण मुख्यमंत्री व विविध अधिकार्‍यांची सरळ मार्गासाठी भेट घेतली. रेल्वेमार्ग सरळ झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी असून उत्तर महाराष्ट्राच्या विकासात खो घालण्याचे पाप केले आहे. त्यांचा हा निर्णय अत्यंत असंवेदनशील असून आपण या निर्णयाचा तीव्र निषेध करत आहे.
सत्यजीत तांबे (आमदार)

ताज्या बातम्या

‘बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड कधीच करणार नाही’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित भव्य मेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत...