Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलकावरून तणाव; दोन गटांत बाचाबाची व धरपकड

पुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलकावरून तणाव; दोन गटांत बाचाबाची व धरपकड

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलक लावण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या वादात पंचाक्षरी आणि सतीश शुक्ल यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत धरपकड केली.

संघाच्या कार्यालयाबाहेर कार्यकारिणीचा फलक लावण्याचा प्रयत्न केला जात असताना एका गटाने त्याला विरोध दर्शवला. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. दोन्ही गटांचे सदस्य आणि पदाधिकारी आमने-सामने आले आणि बाचाबाचीला सुरुवात झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या संपूर्ण प्रकारामुळे पंचवटी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

टाकळीभान-नेवासा मार्गावर दुचाकींचा भीषण अपघात; धडक देऊन दुचाकीस्वार पसार, एकजण गंभीर...

0
टाकळीभान (प्रतिनिधी) रस्त्यावरील बेफाम वेगाचा आणि माणुसकी हरवलेल्या वृत्तीचा प्रत्यय देणारी एक घटना टाकळीभान-नेवासा राज्यमार्गावर घडली आहे. लोखंडी फाॕल परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक...