Thursday, September 3, 2026
HomeनाशिकNashik Rain News : गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी - विभागीय...

Nashik Rain News : गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आवाहन

नाशिक | Nashik

- Advertisement -

गंगापूर धरण व परिसरात कालपासून पाऊस (Rain) सुरू असल्याने गंगापूर धरणात (Gangapur Dam) पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्या- टप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. आज सायंकाळपर्यंत गोदावरी नदीत पाणी सोडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला; दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी, तीन वाजेनंतर धोकादायक परिस्थितीची शक्यता

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम (Praven Gedam) पोलिस आयुक्त डाॅ संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी आज दुपारी होळकर पुलावरून रामकुंड व गोदावरी नदी परिसरातील पुराची पाहणी केली. त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशिकमध्ये रात्रभर जोरदार पाऊस; गोदावरीला पूर, रामकुंडावरील मंदिरे पाण्याखाली

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलिस, मनपा, जिल्हा परिषद प्रशासनाला दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आवश्यक तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता नागरिकांनी नदी काठावर गर्दी करू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

हे देखील वाचा : Trimbakeshwar Rain News : त्र्यंबकेश्वरला वादळी वाऱ्यासह पाऊस; घराचे पत्रे उडून तीन भाविक जखमी, एक गंभीर

ताज्या बातम्या

Belapur : चंपत राय यांच्या जागी बेलापूरचे भूमिपूत्र

0
बेलापूर |वार्ताहर| Belapur येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांची अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. काल अयोध्या येथे श्रीराम मंदिर...