Sunday, August 30, 2026
HomeनाशिकNashik Rain News : पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस; पुलांवरून पाणी वाहिल्याने जनजीवन...

Nashik Rain News : पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस; पुलांवरून पाणी वाहिल्याने जनजीवन विस्कळीत

कोहोर | वार्ताहर | Kohor

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पश्चिम पट्ट्यात येत असलेल्या पेठ तालुक्यात (Peth Taluka) सध्या जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून, लहान-मोठ्या नद्या काठोकाठ दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही लहान पुलांवरून नदीचे पाणी वाहत असल्याने तालुक्यातील दळणवळणासह जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गत चार ते पाच दिवसापासून तालुक्यातील ग्रामीण भागात (Rural Area) सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. घाटमाथा आणि डोंगराळ भागात पाऊस जास्त असल्याने नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तसेच डोंगराचा भराव थेट रस्त्यावर आल्याने काही गावाचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, रस्तेच बंद पडल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह (Student) नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे येणे कठीण झाले आहे. केटी बंधाऱ्याच्या भरावावरुन, तसेच फरशी आणि पुलावरून पाणी जात असल्याने नागरिकांनी पलीकडे ओलांडून जावू नये, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच परभणीत ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा...

0
परभणी । Parbhani शेतकरी, युवक आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांमुळे चर्चेत असलेल्या परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात रविवारी एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री...