Tuesday, September 1, 2026
HomeनाशिकNashik Rain News : सहा दिवसानंतर पावसाची नाशकात हजेरी

Nashik Rain News : सहा दिवसानंतर पावसाची नाशकात हजेरी


नाशिक | Nashik

- Advertisement -

मान्सूनचे (Monsoon) राज्यात आगमन होऊनही काही शहरांत अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाच दिवसांपूर्वी शहरातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून आले.

यानंतर (रविवारी) चार वाजेच्या सुमारास पावसाने शहरातील विविध भागांत हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या या पावसामुळे नाशिककरांची (Nashik) चांगलीच तारांबळ उडाली. तर दुसरीकडे रखडलेल्या शेतीच्या कामांना गती मिळणार असल्याने बळीराजा प्रचंड सुखावला आहे. दुपारी अचानक आभाळ भरून आल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.

त्यानंतर सीबीएस, मेहेर चौक, सारडा सर्कल आणि मुंबई नाका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सखल भागांत पाणी (Water) साचल्याने वाहनधारकांना संथ गतीने प्रवास करावा लागला.तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी लपण्यासाठी पानटपऱ्यांचा आश्रय घेतला होता.

ग्रामीण भागात शेती कामांना वेग

नाशिक शहरात आठवडाभर जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी ग्रामीण भागात मात्र पावसाने हजेरी कायम ठेवली होती. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि पेठ या तालुक्यांत चांगलाच पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक विस्तारावर भर; २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यस्तरीय चिंतन शिबिर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार)संघटनात्मक विस्तारासाठी व्यापक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या पक्षाकडे लोकसभेतील १ खासदार आणि विधानसभेतील ४१ आमदार...