Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकरांना अवघ्या दोन तासात गाठता येणार सुरत शहर

नाशिकरांना अवघ्या दोन तासात गाठता येणार सुरत शहर

देवळाली कॅम्प । वार्ताहर

केंद्राच्या ग्रीन-फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार चेन्नई-सुरुत सहा पदरीकरण महामार्गाच्या सादरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत सुरत ते चेन्नई हे 1600 किलोमीटरचे अंतर 1250 किलोमीटरवर येणार असून हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून जाणार असल्याने नाशिक-सुरत दरम्यानचे अंतर अवघे 176 किलोमीटरवर येऊन नाशिकरांना अवघ्या दोन तासात सुरत शहर गाठता येणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.

- Advertisement -

सद्यस्थितीत सुरत-मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-बेळगाव-चित्रदुर्ग-तुरकर्म-बँगलोर-चेन्नई असा ग्रीनफिल्ड अंतर्गत असलेला मार्ग सुरत-नाशिक-अहमदनगर कर्माळा-सोलापूर-कर्नल-कडप्पा-चैन्नई असा तयार करण्यात येणार आहे. यामुळे दोन मुख्य शहरांना जोडणार्‍या या मार्गातील अंतर 350 किलोमीटरने कमी होणार असून सहा पदरीकरणामुळे वेळेची देखील बचत होणार आहे. नुकतीच या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांशी खा. गोडसे यांची चर्चा झाली. दरम्यान हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून 176 किलोमीटर अंतर कापणार आहे. या अंतर्गत सुरगाणा-पेठ-दिंडोरी-नाशिक-निफाड-सिन्नर या सहा तालुक्यातून जाणार आहे. जवळपास 122 किलोमीटर हा महामार्ग जिल्ह्यातील 69 गावांपासून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वेळेची बचत तसेच विकासाला चालणार मिळणार आहे.

सुरगाणा, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमधील वनविभागाच्या जमीन हस्तांतरणाच्या प्रक्रिया अंतिम टप्यात असून ती मार्च 2021 नंतरपूर्ण होताच या महामार्गाच्या निविदा काढण्यात येणार आहे. नंतर कामास सुरुवात होणार आहे. सुरत ते अहमदनगर दरम्यानच्या रस्ता कामासाठी जवळपास 15 हजार करोड रुपये खर्च अपेक्षित असून या महामार्गावर केवळ दर वीस किलोमीटर अंतरावर खाली उतरण्यासाठी रस्ता दिला जाणार असुन कोठेही इतर रस्ते जोडले जाणार नसल्यामुळे वाहने प्रति तास 120 किलोमीटर अंतराने धावणार आहेत. नाशिकच्या समृद्धी महामार्गाला हा महामार्ग ओलांडून जाणार आहे. त्यामुळे सुरत ते चैन्नई अंतर कापण्यासाठी केवळ 10 तासांचा कालावधी लागणार आहे. नाशिक-चैन्नई 8 तास, नाशिक-सुरत अवघ्या 2 तासांवर येणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली. यावेळी बी. एस. साळुंखे, डी. आर. पाटील, श्रीनीवास राव हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

या महामार्गामुळे नाशिकरांना अवघ्या दोन तासात सुरत शहर गाठता येणार आहे. त्यामुळे शहरासह व्यापार विकासास चालना मिळणार आहे. महामार्गातर्गंत होणार्‍या बोगद्यांची लांबी, रुंदी 7 मीटर वरुन 9 मीटर व 9 मीटर वरुन 12 मीटर करण्यासंदर्भात सूचविले आहे. यामुळे नाशिककरांना याचा मोठा लाभ होणार आहे.

खा. हेमंत गोडसे

- Advertisment -

ताज्या बातम्या