Thursday, June 18, 2026
HomeनाशिकNashik Trimbakeshwar Crime : त्र्यंबकेश्वरचा 'व्हीआयपी' बाजार; कडलगांच्या खात्यात तेरा लाखांची माया

Nashik Trimbakeshwar Crime : त्र्यंबकेश्वरचा ‘व्हीआयपी’ बाजार; कडलगांच्या खात्यात तेरा लाखांची माया

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जागतिक ख्यातीचे देवस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत (Arrested) असलेले विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, त्यांचे पुतणे ओम व अभिषेक कडलग आणि गोटीराम पेहरे यांना न्यायालयाने २० एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर येत आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या गंभीर मुद्यामध्ये ओम व अभिषेक या संशयितांच्या बँक खात्यातील व्यवहार संशयास्पद आढळले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘डिजिटल पाठलाग’ उघड; रझा, शफिकच्या मोबाईलमधील चॅटिंग अन् सोशल मीडिया रडारवर

अभिषेक कडलग याच्या बँक खात्यात (Bank Account) नोव्हेंबर २०२५ पासून तब्बल ५ लाख ८६ हजार ३१८ रुपये, तर ओम कडलगच्या खात्यात ७ लाख ७० हजार ५८९ रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे. ही रक्कम नेमकी कोठून आली? भाविकांकडून घेतलेल्या रोख रकमेचे हे ‘लॉड्रिंग’ आहे का? यावर संशयितांकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नाही. भाविकांकडून घेतलेली रोख रकम थेट स्वतःच्या खात्यात न भरता, ती हाताखाली काम करणाऱ्या कामगारांच्या खात्यात भरली जायची आणि तिथून ती संशयितांच्या खात्यात वळवली जात होती, असा युक्तिवाद अभियोग कक्षाच्या सहायक संचालक डॉ. किरण बेंडभर व सहायक सरकारी अभियोक्ता कांचन सोनवणे यांनी केला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : कोयत्याने सपासप वार करत युवकाचा खून; दोघे संशयित ताब्यात

‘प्रतीक मिंदे’ या कामगाराच्या खात्यातून १ लाख ७२ हजार १०० रुपये ओम कडलगच्या खात्यात आल्याचे पुरावे एसआयटीच्या (SIT) हाती लागले आहेत. तसेच ‘हॉटेल सत्कार’ मधून अभिषेकच्या खात्यात जमा झालेले १ लाख ३० हजार रुपये जमा झाल्याची नोंद आढळली आहे. त्यामुळे दर्शनाच्या नावाखालीच नाही, तर भाविकांच्या राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेमधूनही कमिशनचे जाळे विणले गेल्याचा संशय एसआयटीने व्यक्त केला आहे. फसवणूक (Fraud) करताना बनावट नावाने नोंद करणे, ही मंदिर प्रशासनातील सुरक्षा यंत्रणेवर असलेल्या दबावाचीच प्रचिती देते.

हे देखील वाचा : Nashik Suicide News : बावीस वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...