Saturday, July 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Suicide News : बावीस वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

Nashik Suicide News : बावीस वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

कळवण | वार्ताहर | Kalwan

कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) सप्तशृंगीगड येथे २२ वर्षीय युवकाने (Youth) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘डिजिटल पाठलाग’ उघड; रझा, शफिकच्या मोबाईलमधील चॅटिंग अन् सोशल मीडिया रडारवर

मिळालेल्या माहितीनुसार, जयेश शामलाला कुमावत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. जयेश हा सप्तशृंगीगडावर (Saptashrungigad) बांधकाम मजुरी करत होता. त्याचे वडील नाशिकमध्ये राहत असल्याने ते त्याचा संपर्क होत नसल्याने नाशिक ते सप्तशृंगीगडावर (Nashik to Saptashrungigad) पाहण्यास आले होते. मात्र, भाडेतत्वावर घेतलेले घरात मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याचे वडील शामलाल कुमावत यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : कोयत्याने सपासप वार करत युवकाचा खून; दोघे संशयित ताब्यात

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे (Kalwan Police Station) पोलीस कर्मचारी योगेश गवळी, पोलीस कर्मचारी बत्तीसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी रुग्णालयात पाठविण्यात आला होता. जयेशने टोकाचे पाऊल उचलण्यामागचे नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकले नसून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Politics News : ठाकरेंचे नगरसेवक फुटणार असल्याची चर्चा; पक्षाचा बडा...

0
नाशिक | Nashik उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांना (MP) आपल्या गटात सामील करून घेतल्यानंतर राज्यातील राजकीय...