Wednesday, June 3, 2026
Homeमुख्य बातम्याNashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला झालेल्या मारहाणीबाबत विश्वस्तांकडून स्पष्टीकरण; म्हणाले,...

Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला झालेल्या मारहाणीबाबत विश्वस्तांकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “त्याने ड्रग्ज…”

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

होळी, धुलिवंदनाच्या सणामुळे सलग सुट्ट्या असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे. या गर्दीला नियंत्रित करतांना तेथील सुरक्षा रक्षकांसह प्रशासनाची दमछाक होत आहे. अशातच काल (रविवारी) त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षा रक्षकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर आता या घटनेवर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत माहिती देताना देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले (Kilash Ghule) म्हणाले की, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शन रांगेत भाविकाला झालेली मारहाण ही वस्तू स्थितीला धरून नाही. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरचा भाविक हा पावणे सहाच्या सुमारास मंदिरात आला. यानंतर दर्शन बारीत तो साधारणता एक तास ध्यान साधनेसाठी बसला होता. मात्र, दर्शनासाठी गर्दी वाढल्यामुळे भाविकांना मंदिरात येण्यासाठी अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला उचलून दक्षिण बाजूच्या दर्शन बारीत बसवले, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले, याच दक्षिण बाजूच्या दर्शन बारीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला. त्याने मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी कपड्यांवर जाण्याचा आग्रह धरला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात दर्शनासाठी जाण्याकरिता सोहळे नेसून जाण्याची परंपरा आहे. ती मोडून भाविकाने आत जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला गाभार्‍याच्या उंबर्‍यावरील एका सुरक्षा रक्षकाने हटकले. मात्र, त्याने जास्त उदिग्न होऊन सुरक्षा रक्षकालाच (Security) शिवीगाळ केली. यावेळी एका सुरक्षा रक्षकाच्या स्वेटरला त्याने गुंडाळले आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यात सुरक्षा रक्षकाच्या डोळ्याला जखम झाली. यानंतर तो ओरडायला लागल्याने इतर सुरक्षा रक्षकांनी त्याला चोप दिला. त्यानंतर त्यांनी त्या भाविकाला उचलून मंदिराबाहेर काढले, असे घुले यांनी सांगितले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर सगळ्या विश्वस्तांनी (Trustees) त्या भाविकाला समज दिली. मात्र, यावेळी त्याने ड्रग्ज घेतल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो एका चांगल्या घरातील मुलगा होता, परंतु ड्रग्जच्या आहारी गेलेला होता, असे निदर्शनास आले. शेवटी त्याने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि निघून गेला, असेही घुलेंनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षारक्षकाकडून मारहाण झाल्याची माहिती चुकीची आहे. हरियाणा येथील एक भाविक ड्रग्ज किंवा नशा घेतलेल्या अवस्थेत मंदिर परिसरात गैरवर्तन करत होता. त्याने सुरक्षारक्षकांशी धक्काबुक्की केली तसेच इतर भाविकांनाही त्रास दिला. दर्शन रांगेतच बसून राहिल्यामुळे दर्शन व्यवस्थेत विलंब होत होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांकडून विनाकारण मारहाण झाल्याची बातमी वस्तुस्थितीशी सुसंगत नाही.

पुरुषोत्तम कडलग -विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

ताज्या बातम्या

Crime News : राहुरी कृषी विद्यापीठातील कंत्राटी मजुराची निर्घृण हत्या

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri महात्मा फुले कृषी विद्यापीठात (Mahatma Phule Agricultural University) कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण...