Thursday, June 18, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parishad Election : नरेंद्र दराडेंनी भरला महायुतीकडून उमेदवारी अर्ज; गिते...

Nashik Vidhan Parishad Election : नरेंद्र दराडेंनी भरला महायुतीकडून उमेदवारी अर्ज; गिते बंधूही रिंगणात, बंडखोरी होणार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान (Voting) होणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (सोमवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिंदेसेनेचे नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांना उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, भाजप अध्यक्ष सुनील केदार, नगरसेवक अजय बोरस्ते, नगरसेवक सुधाकर बडगुजर, गुरमित बग्गा यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : महायुती-मविआमध्ये नाशिकची जागा शिवसेनेकडे; माजी आमदारांना उमेदवारी, गणेश गितेंच्या भूमिकेकडे लक्ष

महायुतीमधील शिंदे शिवसेनेकडून नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांच्यासह विजय करंजकर, अजय बोरस्ते, अंजुम कांदे इच्छुक होते. मात्र, पक्षाचे मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र दराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पक्षातील इतर इच्छुकांना थांबावे लागले. यानंतर शिवसेनेकडून दराडे यांनी आज (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारांच्या संख्येचा विचार करता याठिकाणी महायुतीचे पारडे जड असल्याने त्यांचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र क्रॉस वोटिंग झाल्यास त्याचा फायदा दुसऱ्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते (Ganesh Gite) यांनी एक पक्षाकडून आणि दुसरा अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. मात्र, महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने गणेश गिते युती धर्माचे पालन करत माघार घेतात का? याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहे. तसेच गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे निवडणुकीत ट्विट निर्माण झाला असून चुरस आणखी वाढली आहे. गुरुवार (दि.४ जून) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर; काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि ठाकरे सेनेकडून कुणाला संधी?

आमदार सुहास कांदे नाराज

महायुतीकडून शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावेळी आमदार सुहास कांदे गैरहजर होते. त्यांच्या पत्नी अंजुम कांदे या विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने आमदार सुहास कांदे नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता आमदार कांदेंची नाराजी शिवसेनेकडून कशी दूर केली जाते हे बघणे महत्वाचे असणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणुकीतून माघार? थोड्याच वेळात भूमिका जाहीर करणार

ठाकरे सेनेची माघार

महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा ठाकरे सेनेच्या वाट्याला आली होती. त्यानंतर येथून निफाडचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र,मतदारांचे संख्याबळ जुळत नसल्याचे कारण देत या निवडणुकीतून ठाकरेंच्या शिवसेने माघार घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता मतदानावेळी महाविकास आघाडीची मते कुणाच्या बाजूने जातात, हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...