नाशिक | Nashik
राज्यभर चर्चेत राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या (Nashik Vidhan Parishad Election) विधान परिषद निवडणुकीत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते विजयी झाले आहेत. त्यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला आहे. बहुमत असूनही या निवडणुकीत महायुतीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या निकालावर आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांनी ‘माझा विश्वासघात झाला’ असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी
यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोडून महायुतीच्या (Mahayuti) सर्व नेत्यांनी माझा विश्वासघात केला. आमच्या स्टेजवर यायचं पाठीशी आहोत असं सांगायचं आणि आतून दुसऱ्यांना मदत करायची हे बरोबर नाही. या संपूर्ण प्रकरणाबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत”, असे नरेंद्र दराडे यांनी म्हटले. दराडे यांनी हा आरोप करताना कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा भाजपकडे असल्याचे बोलले जाते.
हे देखील वाचा : Nashik MLC Election : विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गिते विजयी होताच DCM एकनाथ शिंदेनी सूत्रे फिरवली; थेट विशेष विमान…
केसाने गळा कापला – किशोर दराडे
दुसरीकडे महायुतीचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि शिक्षक आमदार किशोर दराडे (MLA Kishor Darade) यांनी “महायुतीच्या नेत्यांनी केसाने आमचा गळा कापला. भाजपकडे २०० हून अधिक, शिंदेसेनेकडे १५० हून अधिक तर राष्ट्रवादीकडे १०० पेक्षा जास्त मते होती मग महायुतीची मते कशी फुटली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : मतमोजणीला सुरुवात; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंनी विजयी होण्याचा केला दावा
गिते किती मतांनी विजयी झाले?
नाशिक विधानपरिषद निवडणुकीचे (Election) एकूण ६१९ मतदान (Voting) होते, त्यापैकी ६१८ मतदान (Voting) झाले होते. त्यानंतर आज (सोमवारी) मतमोजणीवेळी १३ मते अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे ३०३ चा कोटा ठरविण्यात आला. त्यामध्ये गिते यांना ३५७ तर दराडे यांना २४८ मते मिळाली. त्यामुळे गिते हे पहिल्याच फेरीत १०९ मतांनी विजयी झाले.




