Sunday, June 14, 2026
Homeमुख्य बातम्याGanesh Gite : विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेताना गणेश गितेंचा भाजपमधील...

Ganesh Gite : विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेताना गणेश गितेंचा भाजपमधील लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गणेश गिते (Ganesh Gite) यांनी उमेदवारी मागे घेताना पक्षातील काही लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करत नाशिकच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या भेटीनंतर ‘महायुती धर्म’ पाळण्यासाठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : अर्ज माघारीची मुदत संपली; गोकुळ गितेंची उमेदवारी कायम, महायुतीच्या नरेंद्र दराडेंशी होणार लढत

मात्र, यावेळी त्यांनी शहरातील काही सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करणे, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचे आरोप केले. गेल्या काही वर्षांपासून मला आणि माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जात आहे. नाशिकमध्ये (Nashik) गुंडागर्दी आणि दबावाचे राजकारण वाढले आहे. हे थांबले नाही तर शहराचा विकास होणार नाही,” असे गिते म्हणाले.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : राष्ट्रवादीच्या विष्णू म्हैसधुणे, गोरख बोडके यांची निवडणुकीतून माघार; गोकुळ गितेंच्या निर्णयाकडे लक्ष

दरम्यान, पोलीस प्रशासन दोषी नसून काही लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. म्हाडा प्रकरणात (Mhada Case) विनाकारण आपल्याला गोवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.गीते यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून त्यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : मंत्री महाजनांच्या मध्यस्थीला यश! गणेश गिते माघार घेण्याची शक्यता, तर गोकुळ गिते निवडणूक लढण्यावर ठाम

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...