Tuesday, June 23, 2026
Homeमुख्य बातम्याMLA Gokul Gite : काँग्रेसमधून राजकारणास सरुवात ते आमदारकीपर्यंत मजल; महायुतीच्या उमेदवाराला...

MLA Gokul Gite : काँग्रेसमधून राजकारणास सरुवात ते आमदारकीपर्यंत मजल; महायुतीच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारणारे गोकुळ गिते नेमके कोण?

नाशिक | Nashik

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा मोठ्या फरकाने पराभव करत ‘आमदार’पदावर आपले नाव कोरले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या गोकुळ गिते यांनी थेट विधान परिषदेपर्यंत मजल मारल्याने त्यांच्या राजकीय प्रवासाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. गोकुळ गिते यांचे कुटुंब मूळचे निफाड तालुक्यातील शिंगवे गावचे रहिवासी असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील तेथेच झालेले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गिते आणि गणेश गिते (Ganesh Gite) यांनी शड्डू ठोकला होता. मात्र गणेश गिते यांनी माघार घेतली होती. तर गोकुळ गिते यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे या निवडणुकीकडे नाशिकसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यानंतर आता गोकुळ गितेंनी या निवडणुकीत विजय (Won) मिळविल्याने ते नेमके कोण आहेत, पार्श्वभूमी काय? याची चर्चा राज्यभर होऊ लागली आहे.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : “माझा विश्वासघात…”; पराभवानंतर नरेंद्र दराडेंची संतप्त प्रतिक्रिया

गोकुळ गिते यांचा परिचय

जन्म – २३ ऑगस्ट १९८९
शिक्षण – १ ली ते ३ री शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिंगवे, ४ थी ते ८ वी मराठा हायस्कूल, ९ वी ते १० वी गोदावरी माध्यमिक विद्यालय शिंगवे, ता. निफाड.
महाविद्यालयीन शिक्षण – गोकुळ गिते यांनी ११ वी १२ वीचे शिक्षण विज्ञान शाखेतून जनता इंग्लिश स्कूल सायखेडा, ता निफाड येथून घेतले आहे. तर बीएचे शिक्षण देखील सायखेडा येथे घेतले आहे.

राजकीय कारकीर्द

नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते हे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांचे बंधू आणि विद्यमान भाजप नगरसेविका दिपाली गिते यांचे दीर आहेत. गणेश गिते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गिते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे. २०२४ साली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या गणेश गिते यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा गोकुळ गिते यांनी सांभाळली होती.

गोकुळ गिते यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात २०११ साली काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष म्हणून केली आहे. यानंतर २०१२ साली शिंगवे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून ते निवडून आले. तर २०१५ ते २०२३ या कालावधीत सलग दोन वेळा ते पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले. सध्या ते निफाड तालुक्यातील सायखेडा गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करत होते. मात्र, त्यांनी नाशिक विधानपरिषदेची निवडणूक लढवली असता ते आता आमदार झाले आहेत.

हे देखील वाचा : Gokul Gite : दराडे निष्क्रिय म्हणून मतदारांनी मला निवडले – गोकुळ गितेंचा हल्लाबोल

पत्नीचे शिक्षण

नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांच्या पत्नी उज्ज्वला गिते या देखील उच्चशिक्षित असून,त्यांनी बी.कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे माहेर सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ जून २०२६ – रस्ते वाहनांसाठीच नव्हे पादचार्‍यांसाठीदेखील!

0
देशातील वाढत्या शहरीकरणाच्या चक्रात ‘रस्ते रूंद आणि फुटपाथ अरूंद’ असे विरोधाभासाचे चित्र पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय कोट्यवधी पादचार्‍यांसाठी आशेचा...