Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक विमानसेवेसाठी आशादायी

नाशिक विमानसेवेसाठी आशादायी

सातपूर | प्रतिनिधी | Nashik

जून 2020 मध्ये नाशिक विमानतळावर प्रवासी सातत्याने वाढताना दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नकारात्मक संख्या असली तरी सर्वत्र करोना या रोगाचा प्रदुर्भाव सातत्याने देशभरात वाढत असल्याने सर्व विपरित ऑपरेशनल कंडिशन्स असतानाही नाशिक शहरातून बाहेर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे.

- Advertisement -

देशातील महामारीची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.

मागील वर्षात देशात विमान सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 6 कोटी 76 लाख होती महामार्गामुळे यात घट झाल्याने 20 – 21 यावर्षात आतापर्यंत 44 लाख 22 हजार लोकांनी विमान सेवेचा लाभ घेतला आहे. ही घट 93 टक्क्यांनी आहे.

त्याच वेळी नाशिक मधूनही विमान सेवांअभावी पर्यटकांची संख्याही घटलेली आहे. मागील वर्षात 24 हजार 533 लोकांनी लाभ घेतला होता यंदा हा आकडा 91 टक्क्यांनी घटला असून, यंदा 2,214 लोकांनीच विमान प्रवास केला आहे.

याची कारणमीमांसा ही काही अंशाने वेगळी आहे. जून महिन्यातील विमान सेवेचा विचार केल्यास देशभरात दोन कोटी 33 लाख लोकांनी मागील वर्षी (2019-20)विमान सेवेचा लाभ घेतला होता. संख्या 83 टक्‍क्‍यांनी घटली असुन यंदा 38 लाख 55 हजार लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

नाशिक मधून विविध शहरांना जोडण्याची प्रक्रिया गतिमान झाली असून जून महिन्यामध्ये मागील वर्षी 17 हजार 487 लोकांनी प्रवास केला होता यंदाच्या जून महिन्यात फक्त 2,153 लोकांनी विमान सेवेचा लाभ घेतला.

याला काही अंशाने कारणीभूत ठरलेल्या विविध मुद्द्यांमध्ये मध्यंतरी विमानसेवा सुरु नसणे हा प्रमुख मुद्दा ठरणार आहे. यासोबतच करोना प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणातही 9 टक्के लोकांनी लाभ घेतल्याचे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या