Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराष्ट्रीय महिला आयोगाकडून नरसापूर अत्याचार प्रकरणाची दखल

राष्ट्रीय महिला आयोगाकडून नरसापूर अत्याचार प्रकरणाची दखल

आरोपीला कठोर शिक्षा तसेच कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश

मुंबई | Mumbai

पुण्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार (Nasrapur Child Raped) करत हत्या केल्याच्या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर ग्रामस्थांसह नातेवाईक आक्रमक झाले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा जाहीर करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. या मागणीसाठी बंगळुरु-पुणे महामार्ग (Bangalore-Pune Highway) आंदोलकांनी रोखला. दरम्यान, याप्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (National Commission for Women) घेण्यात आली आहे. हे कृत्य केवळ घृणास्पद नाही, तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन असून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगानं म्हटले आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) पुण्यातील (Pune) नरसापूर प्रकरणाची दखल घेतली आहे. फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने सुनावणी व्हावी अशी माहिती महिला आयोगाने दिली आहे. महाराष्ट्रात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्यंत क्रूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने आज स्वतःहून दखल घेतली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवताना आयोगाने सांगितले की, हे कृत्य केवळ घृणास्पद नाही, तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन असून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

या अमानवीय गुन्ह्याने संपूर्ण देशात वेदना व संताप निर्माण झाला आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला या प्रकरणात तातडीने संज्ञान घेण्याचे व तपासावर बारकाईने देखरेख ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

Shivsena UBT MP Meeting : ‘मातोश्री’वरील बैठकीला कोणत्या खासदाराची उपस्थिती अन्...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ठाकरे सेनेचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या...