नवी दिल्ली | New Delhi
तामिळनाडूमधील (Tamilnadu) विरुधुनगर जिल्ह्यात एका फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट (Firecracker Factory Blast) झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात आतापर्यंत १६ जणांचा होरपळून मृत्यू (Death) झाला असून,मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘डिजिटल पाठलाग’ उघड; रझा, शफिकच्या मोबाईलमधील चॅटिंग अन् सोशल मीडिया रडारवर
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,”हा भीषण स्फोट कट्टनारपट्टी परिसरातील एका क्रॅकर युनिटमध्ये झाला. त्यानंतर आजूबाजूच्या चार युनिट्सना आग (Fire) लागली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. हा स्फोट इतका भीषण होता की आसपासच्या इमारतींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके दाखल झाले. यानंतर ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. सध्या बचावकार्य चालू असून, जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसराला घेराव घालून कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : कोयत्याने सपासप वार करत युवकाचा खून; दोघे संशयित ताब्यात
मुख्यमंत्री स्टालिन यांच्याकडून दु:ख व्यक्त
या दुर्घटनेबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन (M.K.Stalin) यांनी दुःख व्यक्त करत बचाव कार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटले की, “विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनापट्टी येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. मंत्री के. के. एस. एस. आर. रामचंद्रन आणि थंगम थेन्नारासु यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य वेगाने करण्याचे, त्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे स्टालिन म्हणाले.
हे देखील वाचा : Nashik Suicide News : बावीस वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या





