Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDelhi Police : स्फोटकांसह पाच संशयित दहशतवाद्यांना अटक; पाकिस्तानमधून शिजत होता कट

Delhi Police : स्फोटकांसह पाच संशयित दहशतवाद्यांना अटक; पाकिस्तानमधून शिजत होता कट

नवी दिल्ली | New Delhi

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आयएसआयएसचा (ISIS) देशभर हादरवण्याचा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने झारखंड एटीएस आणि रांची पोलिसांच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत (Action) पाच पैकी तीन संशयितांना अटक केली आहे. तसेच संशयित दहशतवाद्यांकडून आयडी बनवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले संशयित (Suspected) पाकिस्तानमधील सूत्रधारांच्या संपर्कात होते. ते यासाठी अनेक सोशल मीडिया खात्यांचा वापर करत होते. या कटातील मुख्य सदस्य अशरफ दानिश भारतातून दहशतवादी मॉड्यूल चालवत होता. रांची येथील त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरून एक देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे, हायड्रोक्लोरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, सल्फर पावडर, तांब्याचे पत्रे, बॉल बेअरिंग्ज, स्ट्रिप वायर्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

YouTube video player

तर आफताब आणि सुफियान हे मुंबईचे रहिवासी असून, त्यांना देखील पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. दिल्ली स्पेशल सेलने मुंबईतील त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवरही छापे (Raid) टाकून तिथून शस्त्रे आणि आयईडी बनवण्याचे साहित्य देखील जप्त केले.सर्व संशयित दहशतवादी सोशल मीडिया अकाउंटद्वारे पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या संपर्कात होते.

दरम्यान, पाच संशयित दहशतवाद्यांपैकी (Terrorists) दोघे दिल्लीतून आणि प्रत्येकी एक मध्य प्रदेश, हैदराबाद आणि रांची येथून अटक करण्यात आला आहे. दानिशकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फर पावडर, तांब्याच्या पट्ट्या, बॉल बेअरिंग्ज, वायर, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...