Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनअभिनेते वीरा साथीदार यांचं करोनामुळे निधन

अभिनेते वीरा साथीदार यांचं करोनामुळे निधन

मुंबई | Mumbai

विचारवंत, लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

- Advertisement -

गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झालं. वीरा साथीदार यांनी १९ मार्चला करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती.

वीरा साथीदार ‘कोर्ट’ या चित्रपटातून रसीक प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि घराघरात पोहोचले होते. या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं. एवढचं नाही तर सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या श्रेणीत ‘कोर्ट’ सिनेमाची निवड झाली होती. शिवाय सिनेमातील वीरा साथीदार यांच्या अभिनयाच भरपूर कौतुक झालं.

वीरा साथीदार यांचा जन्म १६० मध्ये नागपूर येथे झाला. त्यांचे बालपण आणि सुरुवातीचे आयुष्य संघर्षमय गेले. सुरुवातीच्या काळात ते मेंढपाळ म्हणून काम करत होते. दरम्यानच्या काळात त्यांना लोकसंगीत आणि लोकसाहित्याची गोडी लागली. चित्रकला आणि शिल्पकलेसह साहित्यातही वीरा साथिदार यांनी जोरदार मुशाफीरी केली आहे. ते एक कवी आणि गायक म्हणूनही लोकांना परिचीत होते. ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या