Friday, May 3, 2024
HomeUncategorizedराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण; ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण; ‘भोंगा’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

मुंबई – 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज (23 नोव्हेंबर) उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भोंगा या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यासोबतच पाणी, नाळ, चुंबक, तेंडल्या, खरवस आणि आई शप्पथ या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

मराठी चित्रपटांसाठी एकूण 10 पुरस्कार प्रदान करण्यात आले. नाळ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा तर प्रसिध्द अभिनेते स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अंधाधून चित्रपटासाठी अभिनेता अन्शुमन खुराणा आणि उरी : द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशल यांना विभागून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महानटी या तेलगू चित्रपटातील भूमिकेसाठी किर्थी सुरेश या अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या