Thursday, January 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDonald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका; तब्बल २५...

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका; तब्बल २५ टक्के टॅरिफ लादण्याची केली घोषणा

नवी दिल्ली | New Delhi

भारताला (India) अमेरिकेने मोठा धक्का देत २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने रशियाकडून वस्तू खरेदी केल्यामुळे अमेरिकेने (America) हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. येत्या एक ऑगस्टपासून या नव्या निर्णयाची अंमल बजावणी होणार असून, दोन्ही देशांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भारताने इतर देशांकडून मिळत असलेले कच्चे तेल महाग (Expensive) असल्यामुळे ते रशियाकडून स्वस्तात खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला युरोपातील काही देशांनी विरोध केला होता, मात्र त्याला न जुमानता भारताने रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवली होती. त्यामुळे भारताला याबद्दल शिक्षा देण्यासाठी त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे.

YouTube video player

दरम्यान,भारत आणि अमेरिका यांच्यात मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होते. व्यापाराचा तराजू भारताच्या बाजूने झुकलेला आहे. म्हणजेच अमेरिकेत भारतीय मालाची आणि सेवांची आयात जास्त होते. त्यामुळे व्यापाराचा (Trade) तराजू समतोल असावा अशी अमेरिकेची इच्छा आहे.त्यासाठी भारताने कृषी विशेषतः डेअरी उत्पादनं विकण्यासाठी बाजारपेठ खुली करुन द्यावी अशी अमेरिकेची मागणी होती. पण भारतानं या दोन्हीबद्दल कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

भारत आमचा कित्येक वर्षांपासून मित्र आहे. मात्र,मित्र असूनही, भारत आणि अमेरिकेत फारसा व्यापार झाला नाही. गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यापार केला आहे. कारण ते खूप जास्त शुल्क लादतात. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्वात कठीण व्यापार अडथळे आहेत. तसेच, त्यांनी नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे आणि चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाकडून युक्रेनमध्ये होणाऱ्या हत्या थांबवाव्या असे वाटते. सर्व काही चांगले नाही! म्हणून भारताला ०१ ऑगस्टपासून २०२५ टक्के टॅरिफ आणि वरील दंड देईल.

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...