Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCJP Parliament March : 'कॉकरोच जनता पार्टी'चे आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत धडकले; सुरक्षारक्षकांकडून...

CJP Parliament March : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलक संसदेच्या गेटपर्यंत धडकले; सुरक्षारक्षकांकडून चोख बंदोबस्त, परिसरात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

नीट परीक्षा पेपरफुटी (Neet Exam) प्रकरणावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला आज ३१ दिवस पूर्ण झाले आहेत. आंदोलनाच्या (Protest) ३१ व्या दिवशी सीजेपीने जंतरमंतर ते संसद भवन अशा धडक मोर्चाचे आवाहन केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलकांना तिथेच रोखून धरल्याने आणि संसदेच्या सुरक्षेसाठी मोठी तटबंदी उभारल्याने दिल्लीत (Delhi) कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांची नाकेबंदी चकवून आंदोलक संसदेजवळ

संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि सीजेपीचा मोर्चा लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली परिसरात आधीच ‘बीएनएस’ (BNS) कलम १६३ लागू केले होते. जंतरमंतरवरुन एकाही आंदोलकाला बाहेर पडू दिले जात नव्हते. मात्र, देशभरातून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा आणि आंदोलकांचा एक गट पोलिसांना चकवा देत थेट संसद भवनाच्या परिसरात दाखल झाला. आंदोलक संसदेच्या गेटच्या अगदी जवळ पोहोचल्याचे समजताच सुरक्षारक्षकांनी तातडीने धाव घेत संसद मार्ग आणि विजय चौकाच्या बाजूचे गेट्स कुलूप लावून बंद केले.

संसद भवन परिसरात हाय अलर्ट, सुरक्षारक्षक बंदुकांसह सज्ज

सध्या संपूर्ण संसद भवन परिसराला छावणीचे स्वरूप आले असून संसदेकडे जाणाऱ्या सहाही मार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संसदेच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेले ‘सीआयएसएफ’ (CISF) दल हाय अलर्टवर आहे. आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत आत घुसखोरी करू नये, यासाठी सुरक्षारक्षक हातात बंदुका घेऊन तैनात झाले आहेत. तसेच आंदोलकांवर पाण्याचा मारा करण्यासाठी पाण्याचे मोठे पाईप्सही (Water Cannons) घटनास्थळी आणण्यात आले आहेत.

लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

संसद भवनापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर असलेल्या आंदोलकांनी तेथील बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मानवी साखळी तयार केली होती. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. या झटापटीदरम्यान काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. निमलष्करी दल आणि पोलीस बळाचा वापर करून जमावाला हटवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.सध्या संसदेच्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

ताज्या बातम्या

दै.’देशदूत’चा आज ५७ वा वर्धापनदिन सोहळा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik जिल्ह्यातील जनसामान्यांच्या मनात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अढळ स्थान निर्माण करणार्‍या दैनिक ‘देशदूत’चा ५७ वा वर्धापन दिन आज शुक्रवारी (दि....