Wednesday, July 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDelhi Earthquake : दिल्ली भूकंपाने हादरली; १० सेकंद जाणवले धक्के, नागरिक घरातून...

Delhi Earthquake : दिल्ली भूकंपाने हादरली; १० सेकंद जाणवले धक्के, नागरिक घरातून आले बाहेर

नवी दिल्ली | New Delhi

उत्तर भारतातील (North India) दिल्ली-एनसीआर, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशसह अनेक भागांमध्ये आज (गुरुवार) सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के (Earthquake Tremors) जाणवले आहेत. यामध्ये हरियाणातील रोहतक येथे ४.१ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवली गेल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

दिल्लीत सध्या पाऊस (Rain) सुरु असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडीसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्याच दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोक घाबरले आहेत. एनसीआरमधील लोकांना भूकंपांसोबत आवाज ऐकू आल्याने ते घाबरले आणि घरातून बाहेर आले. भूकंप खूपच सौम्य होता. त्यामुळे बहुतेक लोकांना तो समजू शकला नाही. परंतु काही घरे (House) आणि दुकानांमध्ये बसलेल्या लोकांना दारे आणि खिडक्या हलताना दिसल्याने त्या लोकांना भूकंप आल्याचे समजले.

यानंतर त्या लोकांनी एकमेकांना माहिती शेअर केली. तसेच सोशल मीडियातून ही माहिती वेगाने व्हायरल झाली. त्यानंतर भूकंपामुळे मेट्रोही काही काळासाठी थांबवण्यात आली होती. या भूकंपामुळे कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तर भूकंपासंदर्भात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात भूकंपानंतर सर्वजण सुरक्षित असतील, अशी आशा त्यांनी पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. तसेच सर्वांसाठी प्रार्थना करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, १९ एप्रिल रोजी दुपारी अफगाणिस्तानात रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचा परिणाम जम्मू-काश्मीर आणि दिल्ली-एनसीआरपर्यंत (Delhi NCR) जाणवला होता. त्यावेळी यात कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नव्हती. तर नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंप जमिनीपासून ८६ किलोमीटर खाली झाला होता. त्याचा केंद्रबिंदु अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात होता. हा परिसर भूकंपांसाठी संवेदनशील मानला जातो. या भागात भूकंप होणे सामान्य आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : आषाढ सरींचे तांडव सुरू; भंडारदरा ‘एवढे’ टक्के भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात काल मंगळवारी दुपारपासून आषाढसरींनी तांडव नृत्य करण्यास सुरूवात केल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण...