Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडली घटना

नवी दिल्ली | New Delhi

बंगळुरुमध्ये आरसीबीच्या (RCB) विजयी मिरवणूकीत चेंगराचेंगरी (Stampede) झाल्याची घटना बंगळुरुतील चिन्नास्वामी मैदानाबाहेर घडली आहे. या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू (Death) झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू संघाच्या विजयानंतर (Won) बंगळुरू शहरातील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. हे सर्वजण बंगळुरूच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र, याचवेळी अचानक येथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच  चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांची ओळख अद्याप पोलिसांनी (Police) जाहीर केलेली नाही.

YouTube video player

दरम्यान, सध्या आपत्कालीन सेवा देणारे विभाग घटनास्थळी पोहोचले असून,जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये (Hospital) दाखल करण्यात आले आहे. तसेच आयोजकांच्या बेजबाबदारपणापणे गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाने सुरु केला आहे. तसेच मृतांची आणि जखमींची आकडेवारी अद्याप समजलेली नसल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D.K. Shivkumar) यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...