Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाने 'त्या' विधानावरून राहुल गांधींना फटकारले; म्हणाले, "तुम्ही...

Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ विधानावरून राहुल गांधींना फटकारले; म्हणाले, “तुम्ही खरे भारतीय असता तर…”

नवी दिल्ली | New Delhi

सर्वोच्च न्यायालयाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भारतीय सैन्यावर केलेल्या कथित टिप्पणीबद्दल चांगलेच फटकारले आहे. त्यांनी २०२३ च्या भारत जोडो यात्रेदरम्यान चीनने २००० चौरस किलोमीटर भारतीय भूभागावर कब्जा केला आहे, असे म्हटले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. यानंतर राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावत पुढील कार्यवाही स्थगित केली आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले की, “चीनने भारताच्या दोन हजार किलोमीटरपर्यंत जमिनीवर कब्जा केला हे तुम्हाला कसं कळालं. जर तुम्ही सच्चे भारतीय असता तर असं म्हणू शकला नसता”, असे म्हटले. यावर राहुल गांधीचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) सुरुवातीच्या युक्तिवादात म्हणाले, जर विरोधी पक्ष नेत्याला एखादा महत्त्वाचा मुद्दा उचलू दिला जात नसेल नसेल तर ही दुर्देवी परिस्थिती असेल” असे म्हणाले.

त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले की, “तुम्हाला जे काही म्हणायचं ते संसदेत का सांगत नाही. तुम्ही सोशल मीडिया (Social Media) पोस्टमध्ये का सांगता? तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय अशी वक्तव्य का करीत आहात? तुम्ही खरे भारतीय असता तर असं म्हणला नसता”, असे म्हटले.

दरम्यान, यावेळी न्यायालयाने राहुल गांधी यांना एक जबाबदार नेते असल्याची जाणीव देखील करून दिली. सीमेपलीकडे वाद असताना तुम्ही हे सर्व बोलू शकता का? तुम्ही संसदेत (Parliament) प्रश्न का विचारू शकत नाही? असे न्यायालय (Court) म्हणाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्जमाफीच्या घोषणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्थकारणावर यंदाच्या दुष्काळाचेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य...