Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNarendra Modi : "तुम्ही आधीच नग्न आहात हे देशाला…"; PM मोदींचा AI...

Narendra Modi : “तुम्ही आधीच नग्न आहात हे देशाला…”; PM मोदींचा AI समिटमधील आंदोलनावरून काँग्रेसवर तिखट शब्दांत हल्लाबोल

नवी दिल्ली | New Delhi

एआय ग्लोबल समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘शर्टलेस’ आंदोलन केले होते. काँग्रेसच्या या आंदोलनाचा भाजपकडून निषेध करण्यात आला होता. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संताप व्यक्त केला आहे. मोदींच्या हस्ते आज (रविवारी) दिल्ली-मेरठ ‘नमो भारत’ रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) च्या संपूर्ण ८२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले “काँग्रेसच्या या कृतीमुळे राष्ट्रीय कार्यक्रम कमकुवत झाला. या निषेधामुळे तांत्रिक प्रगती आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या प्रतिष्ठा मलिन झाली आहे. एकीकडे, देशवासी भारताच्या विकासासाठी दिवसरात्र काम करत आहेत, परंतु देशात असे काही राजकीय पक्ष आहेत जे भारताचे यश पचवू शकत नाहीत. एआय समिट हा भाजपचा कार्यक्रम नव्हता; तो एक राष्ट्रीय कार्यक्रम होता, राष्ट्रीय सन्मानाचा कार्यक्रम होता. जगभरातील ८० हून अधिक देशांचे प्रतिनिधी दिल्लीला आले असताना, काँग्रेसने भारताच्या एका जागतिक कार्यक्रमाला राजकीय आखाडा बनवले”, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

पुढे ते म्हणाले, “संपूर्ण देश गर्वाने व्यापलेला आहे. पण काँग्रेस आणि त्यांच्या इको सिस्टमने काय केलं? काँग्रेसने भारताच्या एक वैश्विक आयोजनाला आपल्या घाणेरड्या आणि नग्न राजकारणाचा आखाडा बनवला. समारोह स्थळावर विदेशी अतिथींसमोर काँग्रेसचे नेते कपडे काढून पोहोचले. मी काँग्रेसवाल्यांना विचारतो, देशाला माहिती आहे तुम्ही आधीच नग्न आहात, मग कपडे उतरवण्याची गरज काय होती? काँग्रेसच्या नेत्यांनी तिथे जे काही केलं, त्यामुळे असं दिसतंय की देशातील सर्वांत जुना पक्षाचं वैचारिक दिवाळं निघालं आहे”, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली.

तसेच “काँग्रेस आपल्याच देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या नेत्यांची मोदींशी दुष्मनी आहे. त्यांना माझी कबर खोदायची आहे. माझ्या आईलाही ते शिव्या देतात. त्यांचा भाजपा, एनडीएला विरोध आहे. तुम्हाला राजकारणात हेच करणं गरजेचं असेल तर आम्ही हेही सहन करू, पण काँग्रेसने लक्षात ठेवलं पाहिजे की एआय ग्लोबल समिट हा भाजपाचा समारंभ नव्हता. तिथे भाजपाचा नेताही उपस्थित नव्हता. हा देशाचा कार्यक्रम होता. देशाच्या सन्मानाचा कार्यक्रम होता. काँग्रेसने सर्व मर्यादा तोडली. आता पूर्ण देश काँग्रेसच्या नीतीवर थुंकत आहे”, असंही मोदी यांनी सांगितले.

महिला शक्तीचे नेतृत्व

पूर्वीच्या स्थितीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, कधीकाळी संध्याकाळ झाली की या मार्गावर शांतता पसरायची, भीतीचे वातावरण असायचे. आता कायदा-सुव्यवस्था सुधारली असून नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळतो आहे. ‘नमो भारत’ हे नारीशक्तीचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की ट्रेन ऑपरेटर, स्टेशन कंट्रोल स्टाफसह अनेक जबाबदाऱ्या महिला कर्मचारी सांभाळत आहेत, असे मोदींनी म्हटले.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...