Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल; म्हणाले, "आदिवासी समाज तृणमूल काँग्रेसला..."

PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल; म्हणाले, “आदिवासी समाज तृणमूल काँग्रेसला…”

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमधील (TMC) सरकारवर जोरदार टीका केली. ही घटना केवळ राष्ट्रपतींचा अपमान नसून भारताच्या संविधान आणि लोकशाहीच्या भावनेवर आघात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज (रविवारी) दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी सुमारे ३३ हजारांहून अधिक कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करत होते. यावेळी आयोजित जनसभेला संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर ( Mamata Banerjee) निशाणा साधला.

- Advertisement -

मोदी म्हणाले की, “आज देश आंतरराष्ट्रीय महिला दिन (Woman Day) साजरा करत आहे, पण काल पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सरकारने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला. देशाच्या राष्ट्रपतींचा सन्मान राखणे ही प्रत्येक राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले, जे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारच्या घटना लोकशाही मूल्यांना धक्का देणार्‍या आहेत. संविधानाने दिलेल्या पदांचा सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय मतभेद असले तरी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदांबाबत आदर ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.

राष्ट्रपती मुर्मू संथाल समाजाच्या मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी बंगाल मध्ये गेल्या होत्या. मात्र त्यांचा सन्मान करण्याऐवजी टीएमसीने या पवित्र कार्यक्रमाचा बहिष्कार केला. त्या स्वत: आदिवासी समाजातून (Tribal Community) आलेल्या आहेत आणि त्या नेहमीच आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. तरीही राज्य सरकारने या कार्यक्रमाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले नाही. हे केवळ राष्ट्रपतींचा अपमान नाही, तर भारताच्या संविधानाचा आणि लोकशाहीच्या महान परंपरेचाही अपमान आहे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

बंगालची जनता लवकरच चकनाचूर करेल

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, सत्तेचा अहंकार कोणाचाही टिकत नाही. टीएमसीचे गलिच्छ राजकारण आणि सत्तेचा अहंकार, ज्यामुळे एका आदिवासी महिला राष्ट्रपतींचा अपमान झाला, तो बंगालची जनता लवकरच चकनाचूर करेल. पश्चिम बंगालमधील जागरूक जनता, देशातील महिला आणि आदिवासी समाज टीएमसीला हा अपमान कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत नोंदवला होता निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (शनिवारी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना या घटनेला लाजिरवाणी आणि अभूतपूर्व असे संबोधले होते. ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि अभूतपूर्व आहे. लोकशाही आणि आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यामुळे दुःख झाले आहे. राष्ट्रपती महोदया स्वतः आदिवासी समाजातून आलेल्या आहेत. त्यांनी व्यक्त केलेली वेदना आणि संताप भारतातील लोकांच्या मनातही खोल दुःख निर्माण करणारा आहे, असे मोदी म्हणाले होते.

ताज्या बातम्या

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या...