Monday, May 20, 2024
Homeधुळेधुळ्यात 31 रोजी प्रकृती संवर्धन, व्यसनमुक्ती रॅली

धुळ्यात 31 रोजी प्रकृती संवर्धन, व्यसनमुक्ती रॅली

धुळे – प्रतिनिधी dhule

श्री स्वामीनारायण (Sri Swaminarayan) परिवाराचे प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी (Festival) महोत्सवानिमित्त प्रकृती संवर्धन आणि व्यसनमुक्ती जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत पथकाद्वारे घरोघरी व शहरात प्रमुख कार्यालये, बाजारपेठेत जाऊन जनजागृती केली जात आहे.

- Advertisement -

तसेच दि.31मे रोजी तंबाखू निषेध दिनानिमित्त प्रकृति संवर्धन व व्यसन मुक्ती जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे आनंदजीवन स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव चालू आहे. यानिमित्त घर सभा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कुटुंबाने समूह भोजन करणे, समूह प्रार्थना करणे व एकत्र येऊन परिवाराबद्दल चर्चा करणे, त्यामुळे परिवार एकसंघ राहण्यास मदत होते. कारण सध्या पती-पत्नी नोकरी करतात. घरी आल्यावर जवळ बसतात, मात्र एकमेकांशी न बोलता, मोबाईलवर व्हाट्सअप खेळत बसतात. लहान मुलेही मोबाईल मध्ये गुंतले आहेत. त्यामुळे त्यांचा घरातील ज्येष्ठांची स्पर्श कमी होत आहे.

दिवसेंदिवस घराघरातील संवाद कमी होत असून डिस्टन्स अधिक वाढत आहे. मुले मोबाईल मध्ये गुंतल्यामुळे त्यांचे मैदानी खेळ कमी झाले आहेत. त्यामुळे अनेकांना फिजिकली विकण्यात येत आहे. मोबाईल चांगला आहे मात्र व्यवहार विवेक असणे आवश्यक आहे. त्यामुळेच घर सभा हा उपक्रम घेण्यात येत आहे.

तसे तर घर सभा हा उपक्रम प्रमुख स्वामिनी 25 वर्षांपूर्वी सुरू केला असल्याचेही स्वामी आनंद जीवन यांनी सांगितले.

बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने मुला-मुलींना प्रशिक्षण दिले आहे. निर्व्यसनी जीवनाचे फायदे आणि व्यसनामुळे होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनामुळे समाज, राष्ट्र, मानवजातीचे मोठे नुकसान होते. व्यसन म्हणजे एक प्रकारे राक्षस आहे. त्यामुळे प्रशिक्षण दिलेल्या मुलांचे पथके तयार करून त्याद्वारे घरोघरी जाऊन वेसन मुक्त समाजासाठी जनजागृती केली जात आहे. प्रमुख स्वामी यांच्या प्रेरणेने हे अभियान राबविण्यात येत आहे.

प्रकृती संवर्धन अभियान- याबरोबरच वीज, पाणी जपून वापरावे, वृक्षांचे संवर्धन करावे, यासाठी प्रकृती संवर्धन अभियान राबविण्यात येत आहे. आपल्याकडे पाणी असूनही वेळेत मिळत नाही. कारण नियोजनच नाही.

दोन तास पाणी येते. अनेकांचे ते अर्ध्या तासात भरले जाते. मात्र नंतर पाणी वाया जाते. त्यामुळे पाईपलाईनला नळ बसविणे आवश्यक आहे. नागरिकांनी देखील गाडी नळाने धुऊ नये. त्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन कापडाचा वापर करत धुवावी. अन्यथा भविष्यात वॉटर वाढ होईल, अशी भिती देखील स्वामी आनंद जीवन यांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रत्येकाने पाणी वाचवले. घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे. प्रमुख स्वामीनी चाळीस वर्षांपूर्वी हे सांगितले होते.

याबाबत मुलांमध्ये जागृती केली तर पुढील ऐंशी वर्षे त्याचा फायदा होईल. अशा चांगल्या गोष्टी दुसऱ्यालाही सांगाव्यात. याबरोबरच वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण देखील काळाची गरज आहे. वृक्ष एक प्रकारे संतच आहेत. ते कायम एकाच जागी राहतात. तसेच विजेचा देखील आपले होऊ नये. विजेची बचत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठीच वीज वाचवा, पाणी वाचवा व वृक्षारोपण वृक्षसंवर्धन करा असा संदेश देण्यासाठी धुळ्यात दि.31 मे रोजी शहरातील गिंडोडिया ग्राउंड येथून सायंकाळी पाच वाजता भव्य रॅली काढण्यात येणार आहे. धुळ्यात यापूर्वी कधीही निघाली नसेल अशी रॅली राहील. रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होईल.

या रॅलीत बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे बालसंस्कार केंद्राचे सेवेकरी सहभागी होणार आहेत. 28 ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती-व्यसनमुक्तीसह वीज, पाणी बंचत व वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रत्येकी पाच जणांचे 28 ग्रुप तयार करण्यात आले आहेत. हे ग्रुप जिल्ह्यात घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत.

मुलींच्या या ग्रुपने आतापर्यंत अकरा हजार 400 जणांना संदेश दिला आहे. अजून पाच ते सहा हजार जणांपर्यंत पोहोचण्याचे टार्गेट आहे. एक-दोन-तीन टीम कडून स्वामीनारायण मंदिरातही जनजागृती केली जात आहे. तसेच मुलांच्या ग्रुपने दहा हजार जणांना हा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे तीन हजार लोकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी या ग्रुपने प्रात्यक्षिकही दाखविले.

- Advertisment -

ताज्या बातम्या